Join us  

सुपर हेल्दी ब्रेकफास्ट करायचा आहे ? एकदम किंग साईज ? मग नाश्त्याला हे ५ पदार्थ खा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 5:56 PM

दिवसाची सुरूवात उत्तम होण्यासाठी ब्रेकफास्ट चांगला करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे धावतपळत ब्रेकफास्ट करणे टाळले पाहिजे. नाश्ता करण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा आणि हे पदार्थ आवर्जून खा. यामुळे तुमचा नाश्ता नक्कीच होईल सुपर हेल्दी.

ठळक मुद्दे सकाळी आपले पोट रिकामे असल्याने आपण जे खाऊ ते पदार्थ उत्तम पद्धतीने पचविण्यासाठी आपली पचन संस्था तयार असते. त्यामुळे सकाळी सकस आहारच घेतला पाहिजे.जेवणापेक्षाही अधिक महत्त्व नाश्त्याला दिले पाहिजे. कारण हा आपला दिवसातला पहिला आहार असतो आणि तो पौष्टिकच असायला हवा.

नाश्ता हा नेहमी पोटभरूनच केला पाहिजे असे म्हणतात. कारण रात्रीच्या जेवणानंतर पडलेला मोठा गॅप भरून काढायचा असतो. शिवाय दिवसभरासाठी आपल्याला फ्रेश आणि ताजेतवाणेही रहायचे असते. म्हणूनच सकाळच्या नाश्त्यामध्ये फळे, दुध, सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ खावेत, असा सल्ला डॉक्टर देत असतात. पोहे, उपमा, इडली, डोसा असा कोणताही नाश्ता केला तरी  तुमच्या ब्रेकफास्टला अधिक पौष्टिक बनविण्यासाठी खालील पदार्थातला एखादा पदार्थ तरी रोजच्या नाश्त्यामध्ये असायलाच हवा. 

 

१. पपईपपईमध्ये जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही मिळते. त्यामुळे सकाळचा नाश्ता करण्याच्या ५ ते १० मिनिटे आधी पपई खाणे चांगले असते. दिवसाची  सुरूवात फळे  खाऊन करणे कधीही चांगले. सकाळच्या वेळी पपई खाल्ल्याने पचनाचे त्रास दूर होतात. 

 

२. सफरचंदव्हिटॅमिन ए, सी यासोबतच फायबर, लोह, पोटॅशियम आणि इतर अनेक खनिजे सफरचंदमध्ये विपूल प्रमाणात असतात. त्यामुळे सकाळी एक सफरचंद आवर्जून खावे. यामुळे ॲसिडीटी, कॉन्स्टिपेशन असे त्रास कमी होतात आणि पचनसंस्था सुधारते.

 

३. काकडीकाकडी हा थंड पदार्थ आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ब्रेकफास्टमध्ये काकडी खात जावी. काकडीमध्ये असणारे द्रव्य पचन क्रियेसाठी पोषक असते. पोटातील उष्णता कमी करून अन्न पचविण्याचे कामही काकडी करते. तसेच पित्ताचा त्रासही काकडी खाल्ल्याने कमी होतो.

 

४. केळीउत्तम आरोग्यासाठी केळी हा सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय आहे. केळीमध्ये  फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पचनासाठी केळी खाणे कधीही चांगले. ज्यांना वजन वाढवायचे आहे, त्यांच्यासाठी केळी एखाद्या टॉनिकप्रमाणे काम करते. 

 

५. ग्रीन टीसकाळचा नाश्ता झाल्यावर ग्रीन टी घेणे चांगले असते. ग्रीन टी मध्ये असणारे घटक तुमच्या शरीराला उत्तेजना देतात आणि टवटवीत ठेवतात. मेंदूलाही ॲक्टीव्ह बनवितात. त्यामुळे पोटभर नाश्ता केल्यानंतर ग्रीन टी घेण्यास काहीच हरकत नाही.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स