आजकाल साखर पाहिली की अनेक जण दूरदूर पळतात. चहा- कॉफी पण बिनासाखरेची घेतात. कितीही आवडत असतील तरी साखरेचे (Eating sugar is good for health?) पदार्थ खाणं टाळतात. साखर खाल्ली की डायबिटीस झालाच, असाच त्यांचा समज असतो. पण साखरेविषयी मनात असलेला हा बाऊ टाळा. तुम्ही वाईट- वाईट असं म्हणून जी साखर खाणं टाळता, ती जर प्रमाणात खाल्ली तर ती तुमच्या शरीरासाठी मुळीच अपायकारक नाही, असा खास सल्ला देत आहेत सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Experts Opinion About Sugar).
ऋजुता यांनी नुकताच एक व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी साखर खाण्याविषयी अनेक गैरसमज दूर केले आहेत. त्यांचा तो व्हिडिओ साखरेला घाबरणाऱ्या प्रत्येकासाठीच अतिशय उपयुक्त आहे.
हा खिचडी नकाशा पाहा, सांगा यापैकी किती प्रकारची ‘भारतीय’ खिचडी तुम्ही खाल्ली आहे?
या व्हिडिओमध्ये त्या सांगत आहेत की अल्ट्रा प्रोसेस्ड पॅकेज फूड या प्रकारातली साखर खाणं टाळलं पाहिजे. अशा प्रकारची साखर म्हणजे ती साखर तुम्ही कोणत्याही पॅकेज फूडमधून घेता. उदा. कोल्ड्रिंक्स, आइस्क्रिम, वेगवेगळ्या प्रकारची स्विटनर्स, चॉकलेट्स, बिस्किटे, केक, पेस्ट्री, केचअप, वेगवेगळ्या प्रकारचे बटर, जॅम. या पदार्थांमधून पोटात जाणारी साखर निश्चितच आरोग्यासाठी हानिकारक आहे.
कोणती साखर खाणं चांगलं?
ऋजुता सांगतात की आपल्या पारंपरिक गोड पदार्थांमधून किंवा चहा- कॉफी- दूध यांच्यामध्ये टाकून जी साखर आपण घेतो, ती साखर आरोग्यासाठी हानिकारक नाही. ही साखर खाण्याचा आणि मधुमेह होण्याचाही थेट संबंध नाही, असंही त्या सांगतात.
गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी
त्या म्हणतात की प्रोसेस्ड- पॅकेज फूडमधून पोटात जाणाऱ्या अतिरिक्त साखरेमुळे लठ्ठपणा वाढतो, हार्मोनल बॅलेन्स बिघडतो आणि त्यातून मधुमेहाचा त्रास उद्भवतो. दररोज तुमच्या आहारात जर ६ ते ९ टीस्पून एवढी पांढरी साखर असेल, तर ती तुमच्या तब्येतीसाठी मुळीच हानिकारक नाही. त्यामुळे घाबरायचेच असेल तर आपल्या घरी तयार केलेल्या खाद्यपदार्थांमधून पोटात जाणाऱ्या साखरेला न घाबरता प्रोसेस्ड- पॅकेज फूडमधून शरीरात येणाऱ्या साखरेला घाबरा.