पोटाची चरबी (Belly Fat) कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. हात-पाय सडपातळ पण पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढप दिसू लागते. कालांतराने कपडेही फिट बसतात. वाढलेल्या पोटाच्या चरबीला वैतागून बरेच जण खाणं सोडतात. पण खाणं सोडल्याने वजन कमी होईल, पण पोटाची हट्टी चरबी कमी होणार नाही.
डाएट आणि व्यायाम करूनही वजन कमी (Weight Loss) होत नसेल तर, घरातील मसाल्याचा डबा उघडा आणि ५ प्रकारचे मसाले खाऊन वजन कमी करा. या मसाल्यांचा वापर करून आपण पोटाची चरबी कमी करू शकताच, शिवाय इतरही आरोग्यदायी फायदे आपल्याला मिळू शकतात(Weight Loss: 5 Indian spices that cut belly fat).
काळी मिरी
काळी मिरीमुळे फक्त जेवणाची चव वाढत नसून, वजन देखील कमी करण्यास मदत होते. काळी मिरी हे एक मेटाबॉलिज्म बूस्टर आहे. त्यात आढळणारे पाइपरिन, शरीरातील चयापचय दर उत्तेजित करते आणि अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करते.
वजन कमी करताना चहा पिणं किती योग्य? चहा पिऊनही वजन कमी होऊ शकते? तज्ज्ञ सांगतात
आलं
भारतात वाटण-घाटण करताना आल्याचा वापर होतोच. आल्यामध्ये जिंजरॉल नावाचे सक्रीय घटक असते. ज्यामुळे पदार्थाची चव तर वाढतेच, शिवाय पचन सुधारण्यास देखील मदत होते. यासह रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
जिरे
फोडणी देताना आपण जिऱ्याचा वापर हमखास करतोच. फोडणीमध्ये जिरे घालताच, पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. जिरं खाल्ल्याने इन्शुलिनच्या संवेदनशीलतेत बदल होऊ लागते. त्यात असलेल्या फायटोस्टेरॉलच्या मदतीने खराब कोलेस्ट्रॉल कमी करता येते. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर, नियमित जिऱ्याचे पाणी प्या.
लसूण
सकाळी उपाशी पोटी लसूण खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. लसणातील बूस्टिंग लेव्हल कॅलरी बर्न करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. लसणात असलेले एलिसिन, वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासह चयापचय वाढविण्यास मदत करते. यामुळे कंबरेभोवतीची चरबीही कमी होते.
मेथी दाणे
मेथीच्या छोट्याशा दाण्यांमध्ये पोषण तत्त्वांची मात्रा भरपूर असते. मेथी दाण्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ज्यामुळे मेटाबॉलिज्म बुस्ट होते. त्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थितरीत्या पचते. यासह वजन कमी करण्यास मदत होते.