Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी

Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी

भेंडीची भाजी तर आपण नेहमीच खातो. आता भेंडीचं पाणी म्हणजेच Okra Water पिऊन बघा. झटपट वेटलॉस करून फिट रहायचं असेल, तर Okra Water चा हा फंडा करून बघाच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 03:10 PM2021-08-25T15:10:37+5:302021-08-25T15:11:27+5:30

भेंडीची भाजी तर आपण नेहमीच खातो. आता भेंडीचं पाणी म्हणजेच Okra Water पिऊन बघा. झटपट वेटलॉस करून फिट रहायचं असेल, तर Okra Water चा हा फंडा करून बघाच.

Weight loss and Fitness: Benefits of drinking nutritious Okra Water every day in the early morning | Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी

Okra Water अर्थात भेंडीचं पाणी! वेटलॉस आणि फिटनेससाठी जबरदस्त टॉनिक, प्या रोज सकाळी

HighlightsOkra Water घेतल्यास आपल्याला कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स, फायबर, मँगनिज, व्हिटॅमिन सी आणि बी- ६, थायामिन, फॉलेट, मॅग्नेशियम, कॉपर यासारखे अनेक पोषक घटक मिळतात.

भेंडीची भाजी काही लहान मुलांना अतिशय प्रिय असते. पण बऱ्याच मोठ्या माणसांना मात्र या भाजीचा तेवढाच तिटकारा असतो. मस्त भेंडी फ्राय, सुनहरी भेंडी अशा काही स्पेशल डिश केल्या तर ही भाजी आवडीने  खाल्ली जाते. पण नुसतीच फोडणी दिलेली गिळगिळीत भेंडी खायची असेल, तर मात्र अनेक जण नाक मुरडतात. भेंडीची भाजी एकवेळ भलेही नका खाऊ. पण भेंडीचं पाणी मात्र दररोज प्या. भेंडीच्या पाण्यालाच Okra Water असं म्हंटलं जातं. रोज सकाळी जर हे पाणी घेतलं तर वजन कमी तर होतेच पण त्यासोबचत आरोग्याला खूपच लाभ मिळतात. 

 

कसे तयार करायचे भेंडीचे पाणी?
भेंडीचे पाणी म्हणजेच Okra Water बनविणं अत्यंत सोपं आहे. एका व्यक्तीसाठी एक ग्लासभर Okra Water बनवायचे असेल तर त्यासाठी दोन किंवा तीन मध्यम आकाराच्या ताज्या भेंड्या घ्या. या भेंड्यांची वरची आणि खालची टोके काढून टाका. भेंड्या बरोबर मध्यभागी उभ्या चिरून घ्या. एक ग्लासभर पाण्यात चिरलेली भेंडी भिजत टाका. रात्रभर भेंड्या या पाण्यात भिजू द्या. सकाळी हे पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. दररोज जर हे पाणी प्यायचं नसेल तर महिन्यातून एकदा सात दिवसांचा Okra Water पिण्याचा कोर्स केला तरी चालतो. 

 

Okra Water द्वारे आपल्याला मिळते....
दररोज सकाळी नियमितपणे Okra Water घेतल्यास आपल्याला कॅलरीज, प्रोटीन्स, फॅट्स, कार्ब्स, फायबर, मँगनिज, व्हिटॅमिन सी आणि बी- ६, थायामिन, फॉलेट, मॅग्नेशियम, कॉपर यासारखे अनेक पोषक घटक मिळतात.

Okra Water पिण्याचे फायदे
१. वजन होते कमी

Okra Water नियमितपणे घेतल्यास शरीराची चयापचय क्रिया म्हणजेच शरीराचे मेटाबॉलिझम सुधारते. जेव्हा चयापचय क्रिया उत्तम असते, तेव्हा खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होते आणि शरीरामध्ये अनावश्यक चरबी साठून राहणे कमी होते. यामुळे वजन वाढीवर लगेचच नियंत्रण मिळवता येते. तसेच Okra Water मध्ये असणारे कार्ब्स शरीरातील अतिरिक्त चरबी शोषूण घेतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा एक हेल्दी पर्याय म्हणून Okra Water कडे पाहिले जाते.

 

२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते
Okra Water मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने कॅन्सर हाेण्याचा धोकाही कमी होते. कोणत्याही संसर्गजन्य आजारांपासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर Okra Water हा एक उत्तम पर्याय आहे.

३. ब्लड- शुगर लेव्हल मेंटेन होते
भविष्यात मधुमेह होऊ नये, म्हणून तरूण वयातच ब्लड- शुगर लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. Okra Water च्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल योग्य प्रमाणात राखली जाते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने Okra Water घ्यावे. 

 

४. ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त
काही जणांचे हिमोग्लोबिन नेहमी खूपच कमी असते. हिमोग्लोबिन कमी असणे म्हणजे ॲनमिया आणि अशक्तपणा. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, त्यांनी काही दिवस नियमितपणे Okra Water घेतले पाहिजे. यामुळे शरीरात रक्तपेशी तयार होतात आणि हिमोग्लोबिन वाढून अशक्तपणा दूर होतो. 

 

५. डोळ्यांचे आरोग्य सुधारते
भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए असते. त्यामुळे Okra Water घेतल्याने डोळ्यांचे आजारही कमी होतात. सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे स्क्रिनिंग टाईम खूप वाढल्याने लहान मुलांच्या डोळ्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांना देखील एक लहान वाटी Okra Water देण्याचा विचार पालकांनी करावा.

 

६. पोट साफ होते
पचनशक्ती सुधारण्यासाठी Okra Water अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे ज्यांना वारंवार पचनाचा, ॲसिडिटीचा किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो, त्यांनी काही दिवस नियमितपणे Okra Water घ्यावे. सात दिवसांचा कोर्स केला तरी लगचेच फरक दिसून येतो. 
 
 

Web Title: Weight loss and Fitness: Benefits of drinking nutritious Okra Water every day in the early morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.