आपलं स्वयंपाक घर म्हणजे अनेक आजारांवरचा उत्तम उपाय आहे.. आपल्या रोजच्या जीवनातली छोटी- मोठी दुखणी- खुपणी यांच्यासाठीही स्वयंपाकघरात अतिशय उत्तमोत्तम औषधी सापडतात. एवढंच नाही तर वजन कमी करण्याचे (weight loss tips) आणि वजन वाढविण्याचे काही नुस्केही आपल्या स्वयंपाकघरातल्या विविध पदार्थांमध्ये दडून बसलेले आहेत. फक्त आपल्याला ते माहिती नसतात, त्यामुळे त्यांचा योग्य उपयोग करून घेता येत नाही.
असेच काही गुणधर्म आहेत आपल्या रोजच्या जेवणातल्या मसाल्यांमध्ये. उन्हाळ्याच्या शेवटी घराघरांमध्ये काळा मसाला तयार केला जातो. मसाल्याचे अनेक पदार्थ घालून काळा- गोडा मसाला तयार होतो. पदार्थांची चव वाढवायची, एवढा एकच उद्देश त्या मसाल्यांचा नसतो. तर त्यांचं योग्य प्रमाणात सेवन केलं तर ते आरोग्यासाठीही अतिशय गुणकारी असतात, असं आपल्याकडे आयुर्वेदातही सांगितलं आहे. आता वजन कमी करण्यासाठी किंवा कंट्रोलमध्ये (how to control weight) ठेवण्यासाठी कोणत्या मसाल्यांचा कसा उपयोग करायचा, याविषयीची ही माहिती...(Indian spices helps for weight loss)
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मसाल्याचे पदार्थ
१. हळद (turmeric)
चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी हळद उपयुक्त ठरते. त्यामुळे वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हळदीचा निश्चितच उपयोग होतो. सकाळी रिकाम्या पोटी हळद टाकून उकळून कोमट झालेले पाणी, त्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि १ टीस्पून मध टाकून प्यायल्याने वजन नियंत्रित राहते. किंवा रात्री झोपण्यापुर्वी हळद टाकून दूध प्यायल्यानेही फायदा होतो.
२. जिरे (cumin)
वजन कमी करण्यासाठी जिरे टाकून उकळलेलं पाणी पिणं किती फायदेशीर आहे, हे तर आपण जाणतोच.
जिऱ्यांना metabolism inducing element म्हणून ओळखलं जातं. कारण जिऱ्यांचं योग्य प्रमाणात केलेलं सेवन पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर आहे. पोटात गॅस होण्यासाेबतच पचनाशी संबंधित इतर समस्या कमी करण्यासाठीही जिरे उपयुक्त ठरतात. वजन कमी करण्यासाठी रोज रात्री १ टेबलस्पून जिरे पाण्यात भिजत टाका. सकाळी उठून रिकाम्यापोटी ते भिजलेले जिरे खा आणि पाणीही पिऊन घ्या. वजन वेगाने कमी होण्यास मदत होईल.
३. मिरे (black pepper)
fat burning spice म्हणून मिरे ओळखले जातात. एका अभ्यासानुसार मिऱ्यांमध्ये असणारे काही घटक शरीरात फॅट तयार करणाऱ्या यंत्रणेचे कार्य खंडीत करत असतात. त्यामुळे आपोआपच फॅट तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. यासाठी मात्र मिऱ्यांचा वापर मर्यादित हवा. त्याचा अतिरेक नको. सकाळी रिकाम्या पोटी हळद- पाणी- लिंबू असा काढा तयार करून त्यात चिमुटभर मिरेपूड टाकल्याने अधिक चांगला परिणाम दिसून येतो.
४. दालचिनी (Cinnamon)
रक्तातील साखरेची पातळी मर्यादित ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. दालचिनीमध्ये असणाऱ्या घटकांमुळे लवकर भूक लागत नाही. वजन कमी करण्यासाठी सकाळच्या पहिल्या चहामध्ये अर्धा टी स्पून दालचिनी पावडर टाकून प्यायल्याने काही दिवसांतच उत्तम परिणाम दिसून येईल.