Join us

वजन कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करता पण सतत भूक लागतेय? एकदम सोपा उपाय, क्रेव्हिंग गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:11 IST

काही लोक खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना सतत भूक लागते त्यामुळे वजन कमीच होत नाही.

आजच्या काळात वजन कमी करणं खूप कठीण झालं आहे. कारण आपल्याला आपले आवडते पदार्थ खाण्याची सवय लागते आणि जेव्हा आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा आपल्याला तेच पदार्थ खाण्याची इच्छा होते. हे घडणं खूप सामान्य आहे. काही लोक त्यांच्या खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. त्यांना सतत भूक लागते त्यामुळे वजन कमीच होत नाही. एक्सपर्ट काजल अग्रवाल यांनी इन्स्टाग्रामवर याबद्दल महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. त्यांनी क्रेव्हिंग कंट्रोल करण्यासाठी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. 

क्रेव्हिंग कसं करायचं कंट्रोल?

- जेव्हा जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होईल तेव्हा १० ते १५ मिनिटं स्वत:ला त्यापासून डिस्ट्रॅक्ट करा. या काळात तुम्हाला आवडणारं काहीतरी करा. जसं की, वेब सिरीज पाहा, फोनवर संवाद साधा. पुस्तक वाचा, गाणी ऐका. 

- जर तुम्हाला गोड काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तर चॉकलेट किंवा मिठाईऐवजी सफरचंद, केळी किंवा पेरू सारखी फळं खा. पोटही भरेल आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.

- जर तुम्हाला चटपटीच पदार्थ हवे असतील तर भाजलेले मखाना, पॉपकॉर्न किंवा चणे हे उत्तम पर्याय आहेत. यामध्ये कॅलरीज कमी असल्यासोबतच फायबर भरपूर असतं.

- मिंट मॅजिक वापरून तुम्ही क्रेविंग घालवू शकता. यासाठी लवकर ब्रश करा किंवा मिंट फ्लेव्हरचा च्युईंगम चघळा. 

- तुमचं आवडतं अन्न इमॅजिन करा. यामुळे तुमचा मूड लगेच बदलेल आणि तुमचं क्रेव्हिंग कमी होईल.

- जर तुम्हाला काही खाण्याची इच्छा असेल तर काकडी, गाजर खा. शरीरासाठी हे उपयुक्त ठरेल.

- सर्वात महत्त्वाचं म्हणजे, जेव्हा तुम्ही काहीही खाता तेव्हा हळूहळू लहान-लहान तुकडे करून खा आणि व्यवस्थित चावून खा. यामुळे तुम्हाला समाधान मिळतं आणि ओव्हरइटिंग होत नाही.  

टॅग्स :वेट लॉस टिप्स