Join us  

पोट सुटलंय-खाण्यावर कंट्रोलही नाही? घ्या साधा-सोपा डाएट प्लॅन; १५ दिवसांत वजन होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 8:21 PM

Weight Loss Diet Plan (Vajan Kami Karnysasathi Kay khayche) : हिवाळ्याच्या दिवसांत पदार्थांचाआहारात समावेश करून वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता.

हिवाळ्याच्या दिवसांत वजन कमी करणं खूपच कठीण होतं. (How to Loss Weight Faster) पण योग्य पद्धतीचा अवलंब केला तर वजन कमी करणं अगदी सोपं आहे. थंडीच्या दिवसात पचनक्रिया जास्त एक्टिव्ह असते आणि सतत काही ना काही खाण्याची इच्छा होते. बाहेर थंड वातावरण असल्यामुळे लोक व्यायाम करायला कंटाळा करतात. (Weight Loss Diet Plan) हिवाळ्याच्या दिवसांत पदार्थांचाआहारात समावेश करून वजन कंट्रोलमध्ये ठेवू शकता. अनेकजणांना बारीक व्हायचं असतं पण खाण्यावर कंट्रोल नसल्यामुळे डाएट करणं शक्यच होत नाही. . आहारतज्ज्ञ  राधिका गोयल यांनी वजन कमी करण्यासाठी खास डाएट प्लॅन सांगितला आहे. (Weight Loss Tips)

1) सकाळी उठल्यानंतर काय खायचे? (Morning Drink For Weight Loss)

सकाळची सुरूवात भिजवलेल्या धण्यांचे पाणी पिऊन करा. १ टेबलस्पून धणे जवळपास अर्धा लिटर पाण्यात भिजवून ठेवा त्यानंतर सकाळी या पाण्याचे सेवन करा. याबरोबर ५ भिजवलेले बदाम आणि १ अंजीर खा, धण्यांमुळे गॅस, थायरॉईड यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते.अंजीर आणि बदाम खाल्ल्याने शरीराला ताकद  देतात. अंजिर खाल्ल्याने गॅसची समस्या टाळण्यास मदत होते. बदाम खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते आणि महत्वाचे न्युट्रिएंट्स शरीराला मिळतात. 

2) वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खायचं? (Weight Loss Breakfast Idea)

नाश्त्याला १ वाटी दह्याबरोबर बीट आणि बेसनाचा पराठा खा. बेसनामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहत आणि यातून भरपूर प्रोटीन्स मिळतात. बीट आयर्नचा एक चांगला स्त्रोत आहे. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे  त्यांनी आहारात बीटाचे सेवन करायला हवे. दही प्रोबायोटिक्सचा एक चांगला स्त्रोत आहे ज्यामुळे गट हेल्थ चांगली राहते.

2) मधल्यावेळत भूक लागल्यास काय खावे? (Mid day snacks for weight loss)

मधल्या वेळेत एक वाटी सिजनल फ्रुट्स खा यामुळे शरीराला फायबर्स आणि अन्य महत्वाचचे न्युट्रिएंट्स मिळतील. फळांऐवजी भाज्यांचा ज्यूस घ्या.  ज्यामुळे वजन लवकर कमी होईल.

थंडीत ओठ फाटलेत-काळे पडले? आजीनं केलेला घरगुती लिप बाम लावा, गुलाबी-मऊ होतील ओठ

3) वेट लॉससाठी दुपारचं  जेवण कसं असावं? (Weight Loss Lunch)

दुपारच्या जेवणात बॅलेंन्स मील असेल असे पाहा १ वाटी भाजीबरोबर मक्याची किंवा ज्वारीची भाकरी आणि १ ग्लास ताक प्या. याशिवाय १ वाटी सॅलेड खा. वजन कमी करण्यासाठी हे डाएट बेस्ट आहे.

4) संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय (Evening Snack For Weight Loss)

संध्याकाळी गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खा. याबरोबर तुम्ही आलं, लिंबू आणि तुळशीचा चहासुद्धा घेऊ शकता. ही चिक्की तुमच्या शरीराला गरम ठेवले आणि चहा इम्यूनिटी बुस्ट करण्यास मदत करून शरीराल डिटॉक्स करेल.

कितीही खा वजन वाढतच नाही? प्रोटीन पावडरपेक्षा जास्त पॉवरफुल आहे हे 'घरगुती चुर्ण'; एका आठवड्यात दिसेल फरक

५) वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात काय खायचं? (Dinner Option For Weight Loss)

रात्रीच्या जेवणात १ वाटी नाचणीचे सूप आणि १ वाटी सॅलेड खा. ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होईल. झोपताना फॅट बर्निंग ड्रिंकच्या स्वरूपात तुम्ही वेलची, दालचिनी किंवा जिऱ्याचं पाणी पिऊ  शकता. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्य