आजकालच्या धावपळीच्या जीवनात वजन वाढणं (Weight Gain) ही एक सामान्य समस्या बनली आहे. लोक आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे खाणंपिणं आणि व्यायामाकडे लक्ष देऊ शकत नाहीत. (Weight Loss Diet Plan) ज्यामुळे त्यांचे वजन वाढते. ७ दिवसांत वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोजच्या रूटीनमध्ये काही पदार्थांचा समावेश करू शकता ज्यामुळे फक्त तुमचं वजन कमी होणार नाही तर तुम्ही फिट आणि निरोगीसुद्धा राहाल. (How to Loss Weight in 7 Days In a Healthy Way)
आहार कसा असावा?
1) सकाळच्या नाश्त्याला ओट्स, दलिया, दोन उकळलेली अंडी, एक वाटी फ्रुट सॅलेड, ग्रीन टी किंवा ब्लॅक कॉफी घ्या. दुपारच्या जेवणात ब्राऊन राईस, क्विनोआ, ग्रिल्ड चिकन किंवा पनीर, हिरव्या भाज्या, दही किंवा ताक प्या. रात्रीचं जेवण थोडं हलकं असावं. दोन चपात्या, मल्टीग्रेन ब्रेड, बॉईल्ड व्हेजिटेबल्स सूप, ग्रिल्ड फिश, टोफू असावा. मधल्यावेळेत भूक लागल्यास मूठभर ड्रायफ्रुट्स, सफरचंद, पपई, ग्रीन टी, हर्बल टी चा आहारात समावेश करा.
कार्डिओ व्यायाम
2) रोज ३० मिनिटं जॉगिंग करा, सायकल चालवा किंवा पोहोण्याचा सराव करा, वेगानं चालणं हा उत्तम व्यायाम आहे. स्क्वाट्स, पुशअप्स, डम्बेल वर्कआऊट करू शकता.
3) कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या, खाण्याच्या आधी एक ग्लास पाणी प्यायल्यानं भूक कमी लागते, ग्रीन टी किंवा लिंबू पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला होतो.
सद्गुरू सांगतात नियमित 'या' तांदूळाचा भात खा, भरपूर प्रोटीन मिळेल-कॅन्सरचा धोकाही टळेल
चांगली झोप घ्या
4) लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असताना झोपेकडे दुर्लक्ष करतात. रोज ७ ते ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. झोप पूर्ण न झाल्यास शरीरात स्ट्रेस हॉर्मोन वाढतो आणि वजन कमी होत नाही.
खोकला-कफ कमीच होत नाहीये? 2 दिवसांत छातीतला कफ बाहेर काढेल हा खास उपाय
छोट्या प्लेट्स वापरा
5) छोट्या प्लेट्सचा उपयोग केल्यानं तुम्ही जेवणाचं प्रमाणात नियंत्रित करू शकता. ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि जास्तवेळ पोट भरलेलं राहतं. सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी पावडर मधात मिसळून गरम पाण्यात मिसळून प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म चांगला राहतो आणि फॅट बर्न होण्यास मदत होते. रात्री ओव्याचं पाणी भिजवून सकाळी गाळून या पाण्याचे सेवन करा ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते.