वजन कमी करणे हा एक वैयक्तिक प्रवास आहे जो शिस्त, आहार आणि फिटनेस यासह अनेक घटकांवर अवलंबून असतो. वजन कमी करण्यासाठी चांगली झोप आणि विश्रांती देखील खूप आवश्यक आहे. सध्याच्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक महिलांना वजन वाढण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना, एखाद्याने आपल्या जेवणाच्या ताटात कोणते पदार्थ आहेत याकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये अनेक आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. (Weight loss Tips)
न्यूट्रिशनिस्ट अजरा खानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी भात, चपाती आणि तूप खाल्ल्याने वजन कसे कमी करता येते हे सांगितले आहे. व्हिडीओ शेअर करून त्यांनी दाखवले - 'वजन कमी करण्यासाठी नियोजन करताना डिनर प्लेट कशी असावी'. या थाळीला आरोग्यदायी आणि पौष्टिक थाळी म्हणात. त्यात डाळ, भात, पनीर आणि कोशिंबीर यांचा समावेश कसा आहे. (How to lose weight faster)
आजरा खान म्हणाल्या, 'ज्यांना रात्री कार्बोहायड्रेट खाणे आवडते त्यांच्यासाठी ही थाळी खूप आरोग्यदायी ठरू शकते. यामुळे चांगली झोप येते. जो वजन कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. रात्रीच्या वेळी भाताच्या स्वरूपात एका प्रकारचे कार्बोहायड्रेट्स घेतले जाऊ शकतात.
कार्ब खाणं का चांगलं
कार्ब्स बद्दल बोलायचे झाले तर कॉम्प्लेक्स कार्ब्स तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ते केवळ तुम्हाला निरोगी ठेवण्यास मदत करत नाहीत तर जीवनशैलीतील विकारांपासूनही तुमचे रक्षण करतात. इथे नमुद केल्याप्रमाणे रात्रीच्या जेवणाची थाळी घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होईल.