Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

Can Warm Water Help You Lose Weight : गरम पाणी प्यायलं की वजन कमी होतं असं आपण म्हणतो, हे नेमकं कितपत खरं आहे, एक्स्पर्ट म्हणतात ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 08:28 PM2023-09-11T20:28:48+5:302023-09-11T20:52:09+5:30

Can Warm Water Help You Lose Weight : गरम पाणी प्यायलं की वजन कमी होतं असं आपण म्हणतो, हे नेमकं कितपत खरं आहे, एक्स्पर्ट म्हणतात ...

Weight loss: Does sipping on hot water really help you lose belly fat ? | वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

सध्याची बिझी लाइफस्टाइल, धावपळ, बदलती जीवनशैली, अपूरी झोप, अवेळी खाणे अशा बऱ्याच कारणांनी वजन वाढते. हे वाढलेले वजन कमी करणे अनेकांसाठी समस्या होऊन बसते. अशावेळी वजन कमी करण्यासाठी आपण एक ना अनेक उपाय करून पाहतो. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी डाएट, व्यायाम, योगासने असे बरेच उपाय केले जातात. या उपायांसोबतच आपण काहीवेळा कुणी सांगितलेली ऐकीव माहिती, किंवा कुणी फॉलो केलेला एखादा उपाय आजमावून पाहतो. बरेचजण वजन कमी करण्यासाठी सकाळी उठून गरम पाणी पितात. रिकाम्या पोटी विशेष पेये घेणे असो किंवा रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे असो, आपण वजन कमी करण्यासाठी या सर्व गोष्टींचा वापर करतो. पण प्रश्न असा येतो की सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?(Does drinking hot water help with weight loss?).

वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत पाण्याचा एक मोठा भाग असतो, हे तर खरं आहेच. दररोज सकाळी उठून गरम पाणी पिण्याची सवय अनेक जणांना असते. काहीजण दिवसभर गरम पाणीच पितात. कारण गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होतं, असं आपण ऐकलेलं असतं. पण खरंच गरम पाणी पिऊन वजन कमी होतं का? आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डाएटिशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी यांनी, सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होण्यास मदत होते का ? या विषयावर अधिक माहिती दिली आहे(Can Warm Water Help You Lose Weight).

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते का ?

सकाळची सुरुवात गरम पाण्याने करणे शरीरासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. नियमित गरम पाणी प्यायल्याने आपल्याला अनेक गंभीर आजारांशी लढण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रिकाम्या पोटी गरम पाणी पितात. असे म्हटले जाते की रोज रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होते आणि वजन कमी करण्यात फायदा होतो.

कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

आरोग्य हेल्थ सेंटरचे क्लिनिकल डाएटिशियन डॉ. व्ही.डी. त्रिपाठी म्हणतात, "सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. पण गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. गरम पाणी पिणे शरीराला फायदेशीर ठरते परंतु त्याने वजन कमी होतेच असे मानणे योग्य ठरणार नाही. गरम पाणी पिण्याने आपल्या वजनावर त्याचा थेट प्रभाव पडत नाही. गरम पाणी दररोज प्यायल्याने आपली पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्यामुळे शरीरातील चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. गरम पाण्याने वजन कमी होत नाही आणि जास्त प्रमाणात गरम पाणी प्यायल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. दिवसभर थोड्या -थोड्या वेळाने गरम पाणी पीत राहिल्यास मेटाबॉलिज्म सुधारते, फॅट ब्रेक करण्यासाठी गरम पाण्याची मदत होते. त्यामुळे पचनही चांगल्या पद्धतीने होते आणि पाणी पीत राहिल्याने सारखी-सारखी भूकही लागत नाही.

गरम पाणी वजन कमी करण्यास कशी मदत करते ?

दररोज सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. याशिवाय, दररोज गरम पाणी प्यायल्याने पाचनक्रिया  सुधारण्यासाठी देखील फार मदत होते. खरेतर, चयापचय ही शरीरात होणारी एक प्रक्रिया आहे, ज्याच्या योग्य कार्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने बर्न केली जाते. अयोग्य आहार आणि निष्क्रिय जीवनशैलीमुळे शरीरातील पाचन क्रिया मंदावते. रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबीचे रेणू तुटण्यास मदत होते आणि यामुळे आपली पचनशक्तीही वाढते.

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करायला जास्त वेळ लागतो असे का ? वजन लवकर घटत नाही कारण...

नियमितपणे गरम पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे शरीराची पचन क्षमता वाढते. परिणामी, वारंवार भूक लागत नाही. जास्त गरम पाणी पिणे देखील आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. गरम पाणी प्यायलं की काहीही खाल्लं तरी वजन कमी होणारच, असं काहीही नाही. वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यासोबतच आहारात आणि जीवनशैलीमध्ये काही पोषक, सकारात्मक बदल करणं गरजेचं आहे.

Web Title: Weight loss: Does sipping on hot water really help you lose belly fat ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.