वजन वाढणं (Weight Gain) शरीरासाठी जितंक सोपं तितकंच कढीण असतं. वाढलेलं वजन कमी करणं. जर तुम्ही पोट बाहेर आलं असेल तर तुम्हालाही कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकतो. (Weight Loss Drink) पोट वाढण्याचा अर्थ असा की तुमची लाईफस्टाईल खूपच अन्हेल्दी आहे आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे तुम्ही तुमच्या फिजिक्सवर लक्ष देऊ शकत नसाल तर वजन कमी करण्यासाठी योग्य डाएट आणि व्यायाम करण फार महत्वाचे आहे. (How To Loss Weight Easily With Drink)
वजन कमी करण्यासाठी बाजारात बरेच ड्रिंक्स उपलब्ध आहेत. तुम्ही एक हेल्दी ड्रिंक बनवू शकता. ज्यामुळे वजन कमी करणं सहज सोपं होईल. आयुर्वेदीक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. सकाळी सकाळी एक एनर्जी ड्रिंक प्यायल्याने वजन कमी करणं सोपं होईल. डॉक्टर दिक्षा सांगतात की हे एक कुलिंग ड्रिंक आहे. जे तुम्ही सकाळच्यावेळी पिऊ शकतात. काही सोप्या लाईफस्टाईल आईडीया फॉलो करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (Weight Loss Drink For Tummy Fat)
पटकन वजन कमी करण्यासाठी कोणतं पाणी प्यावं गरम की थंड? वेट लॉससाठी एक्सपर्ट्स सांगतात.....
सब्जा म्हणजे तुळशीच्या बीया उत्तम उपाय आहे. डॉक्टर दीक्षा यांच्यामते या बीयांमध्ये अल्फा लिनोलेनिक एसिड असते. ज्यात हेल्दी फॅट्स असतात. ज्यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे शरीरात फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी हे फायबर्स उत्तम ठरतात.
दुसरा इंग्रेडिएंड आहे लिंबू, लिंबाने डायजेशन चांगले होण्यास मदत होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्मवर चांगला परिणाम होतो. ज्यामुळे भूकही नियंत्रणात राहते.
वजन कमी करण्यासाठी लिंबूच्या ड्रिंक्सचा आहारात समावेश करू शकता. लिंबाने लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते. ज्यामुळे भूक लागते आणि तहानही भागते. म्हणूनच वजन कमी करण्याासटी लिंबूच्या ड्रिंक्सचा आहारात समावेश करा. लिंबात व्हिटामीन सी, पोटॅशियम, फॉस्फरेस, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉलेटसारखे मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला ताकद मिळते.
तिसरा इंग्रिडिएंट म्हणजे मध. हे एक आयुर्वेदीक फॅट बर्नर आहे. याची चवही उत्तम असते. शरीराला बरेच फायदे मिळतात. याची चव गोड असते. दिवसभरातील स्वीट क्रेविंग्स कंट्रोल होण्यास मदत होते. मध गरम असते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि एक्स्ट्रा फॅट कमी होते आणि शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते.
वेट लॉस ड्रिंक कसे बनवायचे? (How To Make Weight Loss Drink)
सगळ्यात आधी सकाळी रूम टेम्परेचरवर एक कप पाणी घ्या. त्यात १ छोटा चमचा सब्जा म्हणजे तुळशीच्या बीया किंवा चिया सिड्स घ्या. त्यात लिंबाचा रस पिळून घाला. शेवटी त्यात १ चमचा मध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे ड्रिंक बनवण्यानंतर ३० मिनिटांनी तुम्ही ते पिऊ शकता.