Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

Weight Loss Drink (Vajan kami karnyasathi upay sanga): वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात तर कधी डायटिंगचा आधार घेतात. पण इतकं सगळं करूनही वजन कमी होत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 10:32 AM2023-12-04T10:32:18+5:302023-12-04T10:41:00+5:30

Weight Loss Drink (Vajan kami karnyasathi upay sanga): वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात तर कधी डायटिंगचा आधार घेतात. पण इतकं सगळं करूनही वजन कमी होत नाही.

Weight Loss Drink : Weight Loss Tips Cumin Seeds Benefits on Empty Stomach | पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

पोट, मांड्याची चरबी खूपच सुटलीये? रिकाम्या पोटी 'हा' पदार्थ घ्या, वजन घटेल-२८ ची होईल कंबर

आजकाल लोकांची लाईफस्टाईल इतकी बदलली आहे की त्यांना दिवसभर बसून एका जागी काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नसतो. तासनतास स्क्रिनकडे बघत काम करावं लागतं, यामुळे फिजिकल एक्टिव्हिजी कमी होते आणि पोटाची चरबी सुटत जाते. वाढत्या वजनावर कंट्रोल ठेवण्यासाठी वेळीच काही उपाय करायला हवेत. अन्यथा हाय ब्लड प्रेशर हाय कोलेस्टेरॉल आणि  थायरॉईड यांसारख्या समस्या वाढत्या वयात उद्भवू शकतात. (Weight Loss Tips Cumin Seeds)

वजन कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात तर कधी डायटिंगचा आधार घेतात. पण इतकं सगळं करूनही वजन कमी होत नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करून वाढत्या वजनावर नियंत्रणं ठेवू शकता.  वजन कमी करण्यासाठी  काही घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. ज्यामुळे वजन वेगानं कमी होण्यास मदत  होते. (How to Prepare Cumin Seeds for Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी या मसाल्याचा वापर करा (How to have jeera water (cumin water) to lose weight)

वजन कमी करण्याासठी किचनमधील जीरं फायदेशीर ठरू शकतं. वजन कमी करण्यासाठी तुम्ही जीरं पावडर आणि  जीऱ्याचं पाणी या दोन्ही वापरू शकता.  सगळ्यात आधी २ चमचे जिरं तव्यावर शेकून घ्या त्यात साजूक तूप घाला. जीरं भाजल्यानंतर आचेवर उतरवून घ्या नंतर थंड करायला ठेवा. ठंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. सकाळच्यावेळी ही पावडर पाण्यासोबत प्या. 

रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे (Benefits of Jeera Water)

१) जर तुमचं पोट साफ होत नसेल आणि सतत गॅस, एसिडिटीची समस्या जाणवत असेल  तर रिकाम्या पोटी जीऱ्याचे पाणी प्या . जिरं पचनक्रिया सुधारण्यास मदत करतं. पचन एंजाईम्स वाढवते. जीऱ्यात थायमोल आणि इसेंशियल ऑईल असते. ज्यामुळे लाळग्रंथी उत्तेजित होते. यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याव्यतिरिक्त खाल्लेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होते. मेटाबॉलिझ्म वाढतो. पोट फुगण्याचा त्रास होत नाही. 

बारीक व्हायचंय पण डाएट नको वाटतं? जेवणात 'ही' डाळ खा; भराभर घटेल पोटाची चरबी-स्लिम दिसाल

२) वाढलेलं एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्टेरॉल आणि धमन्यांच्या भिंतीवर प्लाक तयार होते ज्यामुळे हृदय रोगाच्या समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी जिऱ्याचे सेवन केल्यानं गुड कोलेस्टेरॉल वाढून बॅड कोलेस्टेरॉल कमी होते. 

कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

३) यातील एंटी इंफ्लेमेटरी गुणांमुळे जीरं स्किनशी संबंधित समस्यांना दूर करण्यास मदत करते. यातील एंटी बॅक्टेरिअल गुण त्वचेवरील डाग, पिंपल्स दूर करतात. याव्यतिरिक्त एलर्जीसुद्धा उद्भवत नाही. 

Web Title: Weight Loss Drink : Weight Loss Tips Cumin Seeds Benefits on Empty Stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.