Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी

पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी

Weight Loss Drinks : डाएटिंग जीमचा आधार घेतल्यानंतरही लोकांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. फक्त १ आठवडा काही बेसिक रुल्स फॉलो केले तर वजनात फरक दिसेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:35 AM2023-11-22T11:35:15+5:302023-11-22T14:31:35+5:30

Weight Loss Drinks : डाएटिंग जीमचा आधार घेतल्यानंतरही लोकांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. फक्त १ आठवडा काही बेसिक रुल्स फॉलो केले तर वजनात फरक दिसेल.

Weight Loss Drinks : Starts Your Days With 7 Special Detox Drinks How to Lose weight Fast | पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी

पोट कमी करायचंय पण जीमला जाणं होत नाही? रोज १ उपाय असं ७ दिवस करा, चरबी होईल कमी

वाढतं वजन (Weight Loss Tips) आजकालची सगळ्यात मोठी समस्या बनली आहे. वाढत्या वजनामुळे प्रत्येकजण त्रस्त असतो. खाण्यापिण्याच्या चुका अनियमितेमुळे लोकांच्या शरीरावर चरबी जमा होते. यामुळे फक्त पर्सनॅलिटीवर परिणाम होत नाही तर गंभीर आजार देखिल उद्भवतात.  डाएटिंग जीमचा आधार घेतल्यानंतरही लोकांना हवातसा परिणाम दिसून येत नाही. फक्त १ आठवडा काही बेसिक रुल्स फॉलो केले तर वजनात फरक दिसेल. (Weight Loss Drinks Starts Your Days With 7 Special Detox Drinks)

1) पहिला दिवस - काकडी आणि पुदीन्याचे पाणी

हा उपाय करण्यासाठी काकडी धुवून सालीसकट त्याचे लहान लहान भाग करून घ्या. पुदिन्याची पानंही स्वच्छ करून घ्या. काकडी आणि पुदिन्यात एक ग्लास पाणी घालून ज्यूस तयार करा. मिक्सरमधून काढून गाळून यात चुटकीभर मीठ घालून तुम्ही या ज्यूसचे सेवन करू शकता

2) दुसरा दिवस- लिंबू पाणी

रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. यात व्हिटामीन सी चे प्रमाण भरपूर असते.  यात पेक्टिन फायर्स जास्त प्रमाणात असते. लिंबू पाणी प्यायल्याने यात गुड बॅक्टेरियाजची संख्या वाढते आणि बॅड बॅक्टेरियाज कमी होण्यास मदत होते.  यामुळे शरीराचा मेटाबॉलिक रेटसुद्धा  बुस्ट होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.  

3) तिसरा दिवस - बीट आणि एप्पल सायडर व्हिनेगर

हे तयार करण्यासाठी एका मिक्सरमध्ये जवळपास ३ कप पाणी, काही पुदिन्याची पानं, २ चमचे एप्पल सायडर व्हिनेगर,  अर्ध्या लिंबाचा रस, अर्ध बीट व्यवस्थित दळून घ्या. मिक्सर  १० ते १५ मिनिटांसाठी फिरवून घ्या. नंतर छान ड्रिंक्सचा आस्वाद घ्या.

4) चौथा दिवस- पुदिन्याचा चहा

पुदीन्याचा चहा करण्यासाठी पुदिन्याची पानं एका ग्लास घेऊन पाणी उकळून घ्या नंतर  हे पाणी गाळून त्यात अर्धा चमचा मध मिसळा. या पद्धतीने तुम्ही डिटॉक्स ड्रिंक तयार करू शकता. हे ड्रिंक कोमट झाल्यानंतर याचे सेवन करा. यामुळे भूक कंट्रोलमध्ये राहील याशिवाय बॉडीवेट, बॉडी फॅट कमी करण्यास  फायदे होतील

5) पाचवा दिवस- हळदीचे दूध

हळदीत पॉलिफेनॉल्स आणि करक्यूमिन असते जे मेटाबॉलिक  इंफ्लेमेशन बुस्ट करण्यास मदत करते. याशिवाय यात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेटरी तत्व  शरीरात चरबी जमा होऊ देत नाहीत. खासकरून सकाळच्यावेळी या ड्रिंकचे सेवन केल्यानं भरपूर फायदे मिळतात.

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

6) सहावा दिवस- मेथीचे पाणी

हा उपाय करण्यासाठी मेथीच्या दाण्याचे पाणी १ ग्लास पाण्यात  रात्रभर भिजवण्यासाठी ठेवा त्यानंतर सकाळी हे पाणी घालून रिकाम्या पोटी याचे सेवन करा. मेथीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रोटिन असते.  ज्यामुळे फूड क्रेव्हिंग कमी होतात. लवकर भूकही लागत नाही.

कमी खर्चात भरपूर कॅल्शियम देतील ८ व्हेज पदार्थ; नियमित खा, हाडं होतील बळकट-फिट दिसाल

७) सातवा दिवस - जवसाचे पाणी

जवसात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि वजन कमी करण्यासही मदत होते. फायबर्स पचायला अधिक वेळ लागतो. त्यामुळे लवकर भूक लागत नाही.  यामुळे  कॅलरीज इंटेक कमी होतो. अन्हेल्दी स्नॅकिंग टाळता येते. वजनही निंत्रणात राहते. 

Web Title: Weight Loss Drinks : Starts Your Days With 7 Special Detox Drinks How to Lose weight Fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.