वेळेवर जेवण करायला हवे. ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर वेळेवर केल्याने आरोग्याला फायदाच होतो (Weight Loss). पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण उलट सुलट पदार्थ जास्त प्रमाणात खातो. ज्यामुळे वजन वाढते. व्यायामाचा अभाव, डाएट फॉलो न करणे, यासह इतर कारणांमुळे वजन झपाट्याने वाढत जाते (Fitness). वजन वाढले की, गंभीर जरांचा धोकाही वाढतो.
जर आपण देखील वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असाल तर, झोपण्यापूर्वी एक वेट लॉस ड्रिंक पिऊन पाहा. बहुतांश जण ब्रेकफास्ट आणि लंच स्किप करून डिनर करतात (Weight loss drink). पण डिनर केल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल कमी होते. ज्यामुळे वजन वाढते. जर आपण देखील वजन वाढीच्या समस्येने त्रस्त असाल तर, पोषणतज्ज्ञ मंजू मलिकने शेअर केलेला डिटॉक्स ड्रिंक पिऊन पाहा. वेट लॉससाठी मदत नक्कीच होईल(Weight loss drinks to have before going to bed).
वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक
आहारतज्ज्ञांच्या मते, डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. शिवाय अनियमित मासिक पाळी, मसल्स क्रॅम्प्स, पचनाच्या निगडीत समस्या देखील दूर करण्यास मदत करू शकते. जर आपण हे डिटॉक्स ड्रिंक झोपण्यापूर्वी नियमित प्यायलात तर नक्कीच आरोग्याला फायदा होईल.
डिटॉक्स ड्रिंक करण्यासाठी लागणारं साहित्य
पुदिन्याची पानं
बडीशेप
पावसाळ्यात ४ पदार्थ न चुकता खा, सुधारेल पचन आणि मेटाबॉलिजम वाढल्याने वजनही घटेल पटकन
आलं
पाणी
मीठ
डिटॉक्स ड्रिंक करण्याची योग्य पद्धत
सर्वात आधी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात पुदिन्याची पानं, बडीशेप, आलं घालून मिक्स करा. पाण्याला उकळी आल्यानंतर थोडे मीठ घाला. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा. चहाची गाळणी घ्या, त्यात ड्रिंक ओतून गाळून घ्या. अशा प्रकारे डिटॉक्स ड्रिंक पिण्यासाठी रेडी. कोमट झाल्यानंतर आपण हे ड्रिंक पिऊ शकता.
डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे फायदे
- डिटॉक्स ड्रिंक पिण्याचे अनेक फायदे आहेत. हे वेट लॉससोबत हे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासही मदत करते. यात आपण मध आणि दालचिनी पावडरही मिक्स करू शकता.
२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..
- लिंबू आणि आल्याचे डिटॉक्स ड्रिंक देखील आपण तयार करू शकता. एक कप पाण्यात आलं घालून गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. हवं असल्यास आपण त्यात मध देखील घालू शकता.
- काकडी आणि पुदिन्याचा देखील डिटॉक्स ड्रिंक तयार करू शकता. यासाठी अर्धी काकडीचे गोल चकत्या कापून घ्या. बॉटलमधल्या पाण्यात घाला. नंतर त्यात अर्धा लिंबाचा तुकडा, पुदिन्याची पानं घालून मिक्स करा. तासभर तसेच ठेवा, मग हे पाणी प्या.