Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय

Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय

नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, दिवाळीचे लक्ष्मीपुजन अशा सणांना हमखास लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पण या लाह्या फक्त नैवेद्यापुरत्याच मर्यादित ठेवू नका. कारण झटपट वजन कमी करायचे असेल, तर रोजच लाह्या खा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 01:29 PM2021-08-13T13:29:56+5:302021-08-13T13:30:54+5:30

नागपंचमी, श्रावणी शुक्रवार, दिवाळीचे लक्ष्मीपुजन अशा सणांना हमखास लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. पण या लाह्या फक्त नैवेद्यापुरत्याच मर्यादित ठेवू नका. कारण झटपट वजन कमी करायचे असेल, तर रोजच लाह्या खा.

Weight Loss: Eat popped rice or lahya every day, an easy way to lose weight | Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय

Weight Loss : रोज खा हलक्याफुलक्या लाह्या, वजन कमी करायचा एक सोपा उपाय

Highlightsवाढत्या वजनाने  त्रस्त असणाऱ्या मंडळींसाठी लाह्या हा एक सर्वोत्तम उपाय आहे.

अनेकदा सणासुदीला आपण नैवद्याची परंपरा जपायची म्हणून लाह्या आणतो. खाल्ल्या जात नाहीत म्हणून अगदी थोड्याच लाह्या आणतो. बऱ्याचदा तर त्या लाह्याही वाया जातात. पण खाण्यासाठी हलक्याफुलक्या असणाऱ्या या लाह्या अशा हलक्यात काढू नका. कारण लाह्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असून अगदी बाराही महिने तुम्ही त्या बिनधास्तपणे खाऊ शकता. 


साळीच्या लाह्या पचायला अतिशय हलक्या असतात. शरीरात वाढलेले मेद, कफदोष कमी करण्यासाठी साळीच्या लाह्या अतिशय उपयुक्त आहेत. थकवा न येऊ देता झटपट वजन कमी करायचे असेल, तर अगदी रोज सकाळी नाश्त्यामध्ये तसेच दोन जेवणांच्या मधल्या वेळेत लाह्या खाव्यात असे आहारतज्ज्ञ सांगतात. 

लाह्या कशा तयार होतात
धान्यांना जेव्हा भट्टीमध्ये भाजून उष्णता दिली जाते, तेव्हा लाह्या तयार होतात. उष्णता मिळाल्यामुळे लाह्या पचनास हलक्या होतात. त्यांच्यातील कॅलरीज अतिशय कमी होतात. लाह्यांमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे चयापचय क्रिया सुधारण्यासाठीही लाह्या खाव्यात. वाढत्या वजनाने  त्रस्त असणाऱ्या मंडळींसाठी लाह्या हा एक सर्वोत्तम उपाय आहे. लाह्यांमध्ये लोह, तंतू, फॉस्फरस, क्षार, कॅल्शियम,  व्हिटॅमिन डी, थायमिन, राइबोफ्लेव्हिन योग्य प्रमाणात असतात. बाजारात ज्वारी, राजगिरा, गहू, साळी आण मक्याच्या लाह्या अगदी सहजपणे उपलब्ध असतात. फक्त आपल्याला त्यांचा आरोग्याला होणारा लाभ माहिती नसल्याने आपण लाह्यांकडे दुर्लक्ष करतो. 

 

लाह्या खाण्याचे फायदे
१. पचनक्रिया सुधारते
लाह्या खाल्ल्यामुळे शरीराचे मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया सुधारते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि शरीरातील चरबी वाढत नाही. तसेच मळमळ, उलट्या, ॲसिडिटी, जुलाब असे पचनासंबंधी असणारे आजारही लाह्यांच्या सेवनामुळे बरे होतात. कॉन्स्टिपेशनचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनीही आहारात नियमितपणे लाह्या खाव्या. 

 

२. अशक्त लोकांसाठी लाभदायक
लाह्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अशक्त व्यक्तींसाठीही लाह्या खाणे फायद्याचे असते. लाह्या पचायला जरी हलक्या असल्या तरी शक्ती देणाऱ्या असतात. त्यामुळे ॲनिमिक व्यक्तींनीही दररोज लाह्या खाव्या.

३. हाडांना मिळते मजबूती
लाह्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी लाह्या अतिशय उपयुक्त ठरतात. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे लाह्या खाव्या. हाडांसोबतच दात आणि केस मजबूत करण्यासाठीही लाह्या खाण्याचा सल्ला दिला जातो. 

 

४. लाह्यांमुळे वाढते सौंदर्य
लाह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य वाढविण्यासाठीही लाह्या खाणे फायदेशीर आहे. साळीच्या लाह्यांची पावडर दुधात मिसळून त्वचेवर लावली जाते. तो एक उत्तम फेसपॅक आहे. त्यामुळे चेहऱ्यावरचे फाेडं, वांगाचे डाग, सुरकुत्या कमी होतात.

५. वजन कमी करण्याचा उत्तम इलाज
शरीरातील ऊर्जेची पातळी वाढविण्याचे काम लाह्यांद्वारे होते. त्यामुळे भूक लागण्याचा कालावधी वाढतो आणि साहजिकच अन्न कमी खाल्ले जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनी नाश्त्याला साळीच्या लाह्या अवश्य खाव्या.

 

६. हृदयविकाराचा धोका होतो कमी
साळीच्य लाह्यांच्या नियमित सेवनामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते आणि हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता कमी होते. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे कामही लाह्या करतात.

 

Web Title: Weight Loss: Eat popped rice or lahya every day, an easy way to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.