आजकाल वजन वाढणं (Weight Loss Tips) हा सर्वांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. (Health Tips) जिम, व्यायाम, जुंबा करूनही लोकांचे वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची मदत घेऊ शकता. आहारतज्ज्ञ आणि वेटलॉस एक्सपर्ट्स या गोष्टींचा सल्ला देतात. (Weight Loss Diet Plan)
इंस्टाग्रावर एक पूर्ण डाएट त्यांनी आपल्या फॉलोअर्ससोबत शेअर केले आहे. (Health Tips) या डाएटमध्ये त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश करावा याबाबत एक डाएट चार्ट शेअर केला आहे. ज्यात त्यांनी जेवणाच्यामध्ये आणि जेवणाच्या वेळेस काय खावे याबाबत अधिक माहिती दिली आहे. (Weight Loss Diet Plan)
एनएचएस युके च्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी थोड्या वेळासाठी डाएट करू नका. जी गोष्टी तुम्ही लॉन्ट टर्म फॉलो करू शकता अशाच गोष्टी करा. अन्हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करू नका, जेवण सोडण्याची चूक करू नका. कारण जेवण स्किप केल्यानं तुम्हाला जास्त भूक लागेल आणि तुम्ही अन्हेल्दी पदार्थ खाल. पोट भरल्यानंतर जास्त खाऊ नका.
दातांना आतून किड लागलीये-पिवळट दिसतात? ५ पदार्थ चावून खा, किड निघेल-स्वच्छ होतील दात
१) सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान काय खावे?
पवन डागर यांच्यामते सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान दालचिनी किंवा हळदीची चहा तुम्ही पिऊ शकता. दुसरा ऑपश्न म्हणजे १ कप मेथीच्या दाण्यांचा चहासुद्धा पिऊ शकता.
२) ९ वाजता ब्रेकफास्ट
सकाळी ९ वाजता ब्रेकफास्ट करा. यादरम्यान तुम्ही पनीर बेसन चिला, हिरवी चटणी खाऊ शकता किंवा २ व्हिट ब्रेड आणि पनीर सॅण्डविच खाऊ शकता.
३) मिड मॉर्निंग ११:३०
डॉक्टर सांगतात या वेळेसाठी तुमच्याकडे २ पर्याय आहे. पहिला पर्याय असा की १० ते १५ बदाम खा. दुसरा पर्याय असा की तुम्ही सिजलन फ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता.
४) दुपारचे जेवण
दुपारच्या जेवणात तुम्हाला २ पर्याय असतील पहिला ऑपश्न म्हणजे १ मक्याची चपाती, सरसो साग, सॅलेड खाऊ शकतात, दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही १ चपाती, सोया चंक्सची भाजी आणि सॅलेड खाऊ शकता.
५) संध्याकाळचा नाश्ता ५ वाजता
संध्याकाळच्या नाश्त्याला भूक मिटवण्यासाठी तुम्ही १ वाटी रोस्टेड मखाने आणि शेंगदाणे खाऊ शकता. १ वाटी चण्याचे सेवन करू शकता.
६) रात्रीचे जेवण
रात्रीच्या जेवणात तुम्ही हलका आहारात घेऊ शशकता. डाएट चार्टनुसार तुम्ही व्हिजिटेबल, दलिया खाऊ शकतात. १ वाटी व्हेजिटेबल सूप पिऊ शकतात. भाजलेल्या भाज्यांबरोबर पनीर खाऊ शकता.