Join us  

डाएट करुनही वजन कमी होत नाही? 4 चुकांमुळे होतंय तुमचं डाएट फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 8:22 PM

 अनेकजणांची तक्रार असते की महिनोनमहिने डाएट फॉलो करुनही वजन कमी होत नाही. याला गूढ म्हणावं की काय?असा प्रश्न पडतो. पण या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर आणि  डाएट करुनही वजन कमी न होण्यामागचं कारण प्रसिध्द पोषण तज्ज्ञ नॅन्सी देहरा सांगतात.

ठळक मुद्देसलाड भरपूर खाणं हे योग्य पण सलाडवर ड्रेसिंग करताय का? फळं ही वजन कमी करण्यासाठी उपयुक्तच. पण किती खावी याला काही मर्यादा?डाएट करताय पण नुसतं बसून राहाताय, मग काय उपयोग?Image: Google

वजन वाढायला वेळ लागत नाही. पण कमी होण्यासाठी महिनोनमहिने प्रयत्न करावे लागतात. बदलत्या जीवनशैलीमुळे, सदोष आहारशैलीमुळे वजन वाढण्याची समस्या वैयक्तिक न राहाता जागतिक झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानुसार जगभरात 1.9 अब्ज लोक वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. याचा अर्थ सात पैकी         दोनजण वजन वाढीला सामोरं जात आहे.

Image: Google

वजन कमी करण्याचा मार्ग म्हणून डाएटिंग केलं जातं. पण डाएटिंगचा चुकीचा अर्थ काढून अनेकजण वजन कमी करण्यासाठी उपाशी राहातात, कमी खातात तर अनेकजण शास्त्रीय आधार नसलेले डाएट फॉलो करुन आपली आहे ती समस्या आणखी वाढवून घेतात. अनेकजणांची तर ही तक्रार असते की महिनोनमहिने डाएट फॉलो करुनही वजन कमी होत नाही. याला गूढ म्हणावं की काय?असा प्रश्न पडतो.

पण या प्रश्नाचं शास्त्रीय उत्तर आणि डाएट करुनही वजन कमी न होण्यामागची कारणं  प्रसिध्द पोषण तज्ज्ञ नॅन्सी देहरा यांनी आपल्या इन्स्ट्राग्राम पोस्टमधून सांगितले आहेत.  सांगतात. त्या दोन महत्त्वाचे प्रश्न विचारतात, तुम्ही डाएट करता हे ठीक पण डाएट करताना नियम पाळता का? डाएट करताना चुका करता का? या चुकांकडे लक्ष द्या म्हणजे डाएट करुनही वजन कमी न होण्यामागचं नेमकं कारण कळेल.

https://www.instagram.com/reel/CT4s5OWJydZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="13" >
https://www.instagram.com/reel/CT4s5OWJydZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" target="_blank">
https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink">
View this post on Instagram

https://www.instagram.com/reel/CT4s5OWJydZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" target="_blank">A post shared by Nutritionist Nancy Dehra (@nancy_dehra)

डाएट करताना काय चुका होतात?

नॅन्सी देहरा डाएटमधे कोणत्या चुका होतात याकडे आपलं लक्ष वेधतात.

 1. वजन कमी करण्यासाठी आहारात सलाड आणि फायबरयुक्त पदार्थ खाणं ही चांगली बाब आहे पण सलाड हे बेचव लागू नये म्हणून वेगवेगळे तेल घालून ड्रेसिंग केलं जातं. ड्रेसिंग करण्याच्या नादात सॅलडमधे जे टाकलं जातं त्यामुळे कॅलरीज वाढतात आणि सलाड खाऊनही वजन कमी होत नाही.

2. आपण जे डाएट करतो त्यातील उष्मांकाकडे प्रामुख्यानं लक्ष द्यायला हवं असं नॅन्सी सांगतात. डाएट म्हणून आपण डाळ आणि भाकरी खातो आहोत पण घरातल्या इतरांच्या ताटात व्हाइट सॉस पाहून, शेजवान चटणी पाहून तोंडाला पाणी सुटतं. चवीसाठी म्हणून त्यांच्या ताटतली चटणी खाल्ली जाते. म्हणायला ती चवीपुरती असते पण त्यामुळे आपल्या कॅलरीज वाढतात हे सत्य आहे. व्हाइट सॉसचे दोन घास घेतले तरी 80 ते 120 कॅलरी वाढतात याकडे नॅन्सी लक्ष वेधतात. डाएट करताना इतर काही पदार्थांची चवच घेऊ नये असं नाही. पण हे सारखं होता कामा नये असं नॅन्सी आग्रहानं सांगतात.

Image: Google

3. वजन कमी करण्यासाठी अनेकजण केवळ फलाहार करतात. पण फळांमधे जीवनसत्त्वं, खनिजं, फायबर आणि अँण्टिऑक्सिडण्टस असतात. त्यामुळे आपण कोणतं फळं किती खातोय, त्यातून किती उष्मांक मिळतात आणि आपल्याला किती उष्मांकाची खरी गरज आहे याचा हिशोब लावावा. वजन हे धोकादायक सीमेवर असेल आणि वजन कमी करण्याबाबत आपण जर खरोखरच गंभीर असू तर आपण आहारात जे खाऊ त्यातील कॅलरीजकडे बारकाईनं पाहायला हवं.

4. नॅन्सी म्हणतात केवळ डाएट करुन उपयोगाचं नाही. सोबत शरीराला व्यायाम हवा, हालचाल हवी. नाहीतर डाएट करायचं आणि पलंगावर झोपायचं यामुळे काहीच उपयोग होत नाही. शरीरातील फॅटस जाळण्यासाठी उष्ण्तेची गरज असते. ही उष्णता एका जागी बसून निर्माण होत नाही. यासाठी व्यायाम करणं , घरात शरीराची हालचाल होण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. डाएट करताना चुका टाळून योग्य पध्दतीने नियम पाळले तर वजन कमी होतंच असा नॅन्सी यांना विश्वास वाटतो.