Join us  

व्यायाम केला तरी पोट थुलथुलीतच? मूठभर ‘हा’ हिरवा पदार्थ खा, पचन सुधारेल-पोटही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 4:23 PM

Weight loss, glowing skin: Many benefits of Moong Dal : प्रोटीन खा असं सगळे म्हणतात पण कोणते प्रोटीन योग्य? हा घ्या खास उपाय

आरोग्य तज्ज्ञ निरोगी आयुष्य जगण्यासाठी कडधान्य खाण्याचा सल्ला देतात (Moong dal). कडधान्य खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कडधान्यांमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Weight loss). ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. तूर, मूग, मसूर यासह हिरवे अख्खे मूग देखील खाण्याचे अनेक फायदे आहेत (Fitness). हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई, पोटॅशिअम, आयर्न आणि कॅल्शिअमही आढळते.

मोड आलेले हिरवे मूग शरीरातील कोलेसिस्टोकिनिन हार्मोन वाढवण्याचं काम करतात. या हार्मोनमुळे पोट भरल्यासारखे वाटते. चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि आपले वेट लॉस होते(Weight loss, glowing skin: Many benefits of Moong Dal).

मोड आलेले हिरवे मूग खाण्याचे फायदे

हिरवे मूग अनेक प्रकारे खाल्ली जाते. काही जण शिजवून, भिजत घालून, त्याची साल काढून खातात. आपण हिरवे मूग चपाती, भात किंवा सॅलॅडमध्ये घालून खाऊ शकता. बरेच जण याचा डोसाही करतात. फिटनेस फ्रिक लोक हिरव्या मुगाचा डोसा करून खातात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, हे पदार्थ आवर्जून खा.

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

हिरवे अख्खे मूग खाण्याचे इतर फायदे

- आयुर्वेदाचार्य डॉ. विभा वर्मा सांगतात, 'मोड आलेले हिरवे मूग अँटी-ऑक्सिडंट्सचा उत्तम सोर्स आहे. रिकाम्या पोटी हिरवे मूग खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ज्यामुळे पावसाळ्यातील संसर्गापासून आपले सरंक्षण होते.

- मोड आलेले हिरवे मूग प्रोटीन आणि फायबरचा उत्तम सोर्स आहे. रिकाम्या पोटी सॅलॅडमध्ये मोड आलेले हिरवे मूग घालून खाल्ल्याने फॅट्स बर्न होतात. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो.

- शरीरात रक्ताची कमतरता अनेक समस्या वाढवू शकतात. यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये आयर्न असते. जे हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते.

अमिताभ बच्चन पाहा रोज कसा करतात व्यायाम, त्यांचे ट्रेनर सांगतात-शिस्त आम्हाला त्यांनी शिकवली कारण..

- स्नायूंना बळकटी देण्यासाठी हिरवे मूग मदत करू शकतात. मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे स्नायूंना बळकटी आणि शरीरातील प्रोटीनचे कमतरता दूर होते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स