सध्या बहुतेकजण वाढत्या वजनामुळे हैराण आहेत. यापासून सुटका मिळवण्यासाठी काहीजण डाएटींग तर काहीजण एक्सरसाइजचा पर्याय निवडतात. मात्र या दोन्ही गोष्टीसोबत केल्या तर त्याचा अधिक फायदा आपल्या शरीरावर होतो. वेटलॉसजर्नी दरम्यान डाएटिंग करताना अनेकदा आपल्याला भूक लागते, क्रेविंग्ज होतात. वजन कमी करताना अनेकदा आपल्याला क्रेविंग्ज होतात. या क्रेविंग्जदरम्यान आपल्याला काहीतरी वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात. वजन कमी करण्यासाठी आपला आहार सर्वात महत्वाचा आहे. त्यासाठी आपण दिवसभरात जितक्या कॅलरीज इनटेक करतो, त्याहून अधिक कॅलरीज आपण बर्न करायला हव्यात. जर आपण एका दिवसात खूप जास्त कॅलरीज घेत असाल आणि खूप कमी कॅलरीज बर्न करत असाल तर व्यायाम करूनही वजन कमी होणार नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आपला आहार आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो(How do I stop cravings when dieting?).
वजन कमी करण्याच्या या जर्नीमध्ये प्रथिने आणि फायबरचे प्रमाण कमी केल्याने सारखी भूक लागते. त्याचबरोबर जर आपण पौष्टिक आहार घेत (6 Healthy Alternatives for All Your Cravings During Weight Loss) नसाल तर आपल्याला वारंवार भूक लागते. प्रथिने आणि फायबरयुक्त अन्न खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं आणि शरीराला ऊर्जा मिळत राहते. बहुतेकांना वजन कमी करताना सारखी भूक लागते. त्याचबरोबर सारखं काहीतरी वेगळं खाण्याचे क्रेविंग्स (Weight Loss: Healthy Alternatives For Times When Unhealthy Food Cravings Strike) होत राहतात. सारख्या होणाऱ्या या क्रेविंग्समुळे कदाचित आपले वजन पुन्हा वाढू शकते. या क्रेविंग्जपासून सुटका मिळवायची असल्यास खाण्याचे काही हेल्दी पर्याय पाहूयात(How to Stop Food Cravings).
वेटलॉस दरम्यान क्रेविंग्ज रोखण्यासाठी काही हेल्दी पदार्थाचे पर्याय :-
१. डार्क चॉकलेट :- वेटलॉसजर्नी दरम्यान काही गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स झाल्यास आपण डार्क चॉकलेट खाऊ शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपले क्रेविंग्स पूर्ण होतात त्याचबरोबर डार्क चॉकलेट खाल्ल्याने आपले वजन देखील वाढत नाही. तुमची भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेटमध्ये पुरेसे फायबर असते त्यामुळे डार्क चॉकलेट खाल्ल्याने ती भूक टाळता येते. डार्क चॉकलेटचे दिवसातून दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर एक किंवा दोन तुकडे खाल्ल्याने तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होते.
२. सुकामेवा :- सुक्या मेव्यामध्ये सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. बदाम, काजू, अक्रोड इत्यादींसोबत मनुका खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. सुक्यामेव्यामध्ये नैसर्गिक साखर असते या नैसर्गिक साखरेमुळे आपल्याला सतत लागणारी भूक मंदावते. त्यामुळे सारखे खात राहण्याची आपली इच्छा कमी होते. त्यामुळे वेटलॉस दरम्यान क्रेविंग्स होत असताना सुकामेवा खावा, हे खाल्ल्यामुळे दीर्घकाळासाठी पोट भरलेले राहून भूक लागत नाही. मात्र, तरीही हे नियंत्रणातच खावे.
भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...
३. भाजलेले पदार्थ :- क्रेविंग्स दरम्यान जर आपल्याला काही तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर अशावेळी तळलेले पदार्थ खाणे टाळून भाजलेले पदार्थ खावेत. आपण भाजलेले चणे, शेंगदाणे, मखाणे, कुरमुरे, भाजक्या पोह्यांचा हेल्दी चिवडा असे हेल्दी पदार्थ खाऊ शकता.
४. दही आणि फळे :- गोड खाण्यासोबतच जर शरीराला योग्य पोषण मिळाले तर ते आपल्या आरोग्याला फायदेशीर ठरते. यासाठी आपण सफरचंद, पेर, डाळिंब, संत्री, मोसंबी, कलिंगड यांसारखी रसदार फळे खाऊ शकता. यामध्ये नैसर्गिक साखर असते, जी मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास नुकसान करत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवते. यासोबतच आपण घरचे ताजे दही देखील खाऊ शकता.
वजन कमी करायचे म्हणून नाश्ता करताना करू नका २ चुका, वजनापायी जीवावर बेतेल...
५. नटस आणि सीड्स :- वजन कमी करताना संध्याकाळच्या टी - टाईम स्नॅक्सच्या वेळी कुरकुरीत चिप्स, चिवडा, वेफर्स खाण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या प्रकारचे नटस आणि सीड्स खाऊ शकता.
वेटलॉससाठी गव्हाच्या पिठाऐवजी खा ४ प्रकारच्या पौष्टिक पिठाच्या पोळ्या, वजनात फरक दिसेल झटपट...
६. ताक :- अचानक लागलेली भूक क्षमवण्यासाठी आपण फ्रेश बनवलेले ताक पिऊ शकता. ताक प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि भूकही शांत होते. मिड स्नॅक्ससाठीही हा एक चांगला पर्याय आहे. दह्यापासून बनवलेलं ताक प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. यामध्ये व्हे प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. काही लोक जेवणानंतर अन्न पचवण्यासाठी ताकही पितात. ताकामधील कॅल्शियम आणि प्रथिनांमुळे जास्त वेळ भूक लागत नाही.