Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सकाळी ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, पटकन वजन कमी करण्याचं सिक्रेट

सकाळी ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, पटकन वजन कमी करण्याचं सिक्रेट

Weight Loss Hot Water :हर्बल टी वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते शरीर डिटॉक्स होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 03:52 PM2024-07-17T15:52:21+5:302024-07-17T17:45:51+5:30

Weight Loss Hot Water :हर्बल टी वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते शरीर डिटॉक्स होते.

Weight Loss Hot Water : Is Drinking More Water Can Help You Lose weight | सकाळी ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, पटकन वजन कमी करण्याचं सिक्रेट

सकाळी ग्लासभर गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, पटकन वजन कमी करण्याचं सिक्रेट

आजकाल वजन कमी करण्यासाठी लोक जीम, योगा  असे वेगवेगळे उपाय करतात तर काहीजण गरम पाणी पितात. (Weight Loss Hot Water) जे लोक फिटनेस फ्रिक आहेत ते सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पितात किंवा काहीही मसालेयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर गरम पाणी पितात. तुम्हीसुद्धा गरम पाणी पित असाल तर काही सोपे उपाय करून तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. (Is Drinking More Water Can Help You Lose weight)

गरम पाणी प्यायलयाने शरीरातील विषारी पदार्थ मुत्राद्वारे बाहेर निघतात.  ज्यामुळे शरीरात अतिरिक्त फॅट जमा होत नाहीत. गरम पाणी प्यायलयाने मेटाबॉलिझ्म मजबूत होतो आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत.  तुम्ही जे काही खाता त्या खाल्ल्येल्या अन्नाचं  व्यवस्थित पचन होते. गरम पाणी फॅट मोलेक्युल्सना तोडते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीर डिटॉक्स होते.  वजन कमी करण्यासाठी तुम्ही शारीरिक रुपाने एक्टिव्ह राहणं गरजेचं असतं, ज्यामुळे कॅलरी कमी होतात.

ज्या लोकांना सर्दी, खोकल्याचे त्रास होतात त्यांनी गरम पाण्याचे सेवन करायला हवे. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो आणि आराम मिळतो. मधाला गरम पाण्यात मिसळून तुम्ही सकाळच्यावेळी पिऊ शकता. ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे त्वचा सुंदर दिसते. यात अनेक पोषक तत्व असतात. जसं की व्हिटामीन बी-६, व्हिटामीन सी, एमिनो एसिड्स, कार्बोहायड्रेट्स रायबोफ्लोविन आणि नियासिन गरजेचे असते. यात कॅलरीज आणि शुगर कमी असते.  गरम पाणी प्यायल्याने मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. फॅट ब्रेक होऊन गरम पाणी पिण्यास मदत होते. ज्यामुळे पचन चांगले राहते. हे पाणी प्यायल्याने सतत भूक लागत नाही.

वजन कमी करण्यासाठी टिप्स

1) सकाळी तुम्ही हर्बल टी पिऊ शकता. हर्बल टी वजन कमी करण्यासाठी उत्तम ठरते शरीर डिटॉक्स होते.  सकाळी असा नाश्ता करा जो केल्याने दिवसाच्या  सुरूवातीला पर्याय उर्जा मिळेल.

2) दिवसातून कोणतंही मील स्किप करू नका. फळं आणि सुक्या मेव्याचे सेवन करा. या मिल्सदरम्यान तुम्ही वेगवेगळ्या स्नॅक्सचा आहारात समावेश करू शकतात.  थोडा फार व्यायाम करून तुम्ही शरीरावरचे फॅट वेगाने कमी करू शकता. 
 

Web Title: Weight Loss Hot Water : Is Drinking More Water Can Help You Lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.