Join us  

बापरे! वजन कमी करण्याच्या नादात ऑर्गन फेल्यूअरनं कोमात गेली तरूणी; डाएट करताना तुम्हीही या चुका टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 2:57 PM

Weight loss influencer lexi reed hospitalized : बर्‍याच लोकांना खूप लवकर वजन कमी करायचे असते, यासाठी ते त्यांच्या शरीरावर इतका ताण देतात की त्यांचे शरीरही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात

सध्याच्या जीवनशैलीत वजन कमी करून मेटेंन राहण्याची इच्छा प्रत्येकाच्याच मनात असते. फिगर मेंटेन ठेवण्यासाठी लोक वेगेवगळ्या मार्गांचा अवलंब करतात. अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केलेले वजन कमी करण्याचे उपाय जीवघेणेही ठरू शकतात. सोशल मीडियावर अशीच एक घटना समोर आली आहे. (Weight loss in wrong way)

बर्‍याच लोकांना खूप लवकर वजन कमी करायचे असते, यासाठी ते त्यांच्या शरीरावर इतका ताण देतात की त्यांचे शरीरही प्रतिसाद देत नाही. त्यामुळे शरीरावर खूप वाईट परिणाम होतात. जर एखाद्याने पटकन वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे अवयव काम करणे थांबवू शकतात आणि त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

 एका महिलेने 2 वर्षात 141 किलो वजन कमी केले होते. काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर तिचे अवयव निकामी होत असल्याचे आढळून आले आणि ती कोमात गेली. लेक्सी रीड असे या महिलांचे नाव असून ती सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते. तिचे फोटो समोर आले, ज्यात तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिची प्रकृती अत्यंत नाजूक असून ती कोमात गेल्याची माहितीही फोटोसोबत देण्यात आली होती.

30 वर्षीय लेक्सी रीडने पती डॅनी रीडसोबत वजन कमी केले. 2016 मध्ये लेक्सीचे वजन सुमारे 219 किलो आणि पती डॅनीचे वजन 127 किलो होते. 2 वर्षांत लेक्सीने 141 किलो वजन कमी केले आणि डॅनीने 43 किलो वजन कमी केले. तेव्हापासून तिला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळू लागली. लेक्सी आणि डॅनीच्या म्हणण्यानुसार, दोघांनीही सक्रिय जीवनशैली, व्यायाम आणि आहार यांच्याद्वारे खूप वजन कमी केले होते.

काही दिवसांपूर्वी लेक्सीचा पती डॅनीने पत्नी लेक्सीचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता, ज्यामध्ये लेक्सी आयसीयू बेडवर असल्याचे सांगण्यात आले होते, तिच्या अवयवांनी काम करणे थांबवले आणि ती कोमात गेली.  @fatgirlfedup या फोटोच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, "उशीरा अपडेटसाठी क्षमस्व, परंतु मी लेक्सीला पुन्हा चांगले बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

केस खूप पांढरे झालेत? घरच्याघरीच बीटाची 'अशी' पेस्ट लावून मिळवा नॅच्युरल रेड हेअर्स

पती डॅनीने सांगितले की, ''काही आठवड्यांपूर्वी, लेक्सी आजारी पडली आणि त्याने खाणेपिणे कमी केले होते. तेव्हा मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल केले. आयसीयूनंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, कारण तिच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. मी तिला इथं आणलं नसतं तर तिचा मृत्यू झाला असता असंही डॉक्टरांनी सांगितलं. ती सध्या डायलिसिसवर आहे, ती चालू शकत नाही आणि बरी होत आहे. आमच्याकडे विमा नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुमच्या प्रार्थनेबद्दल सर्वांचे आभार."

संशोधनानुसार, खूप लवकर वजन कमी केल्याने डोकेदुखी, चिडचिड, थकवा, चक्कर येणे, बद्धकोष्ठता, मासिक पाळीत अनियमितता, केस गळणे, स्नायू गळणे, अवयव निकामी होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. एका महिन्यात 1 ते 2 किलो वजन कमी करणे हे हेल्दी आहे. त्यामुळे नेहमी प्रमाणित फिटनेस प्रशिक्षकाचा सल्ला घेऊनच वजन कमी करा.

इतक्या तासांच्या मेकअपनंतर अल्लू अर्जून बनायचा 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला अनुभव

बरेच लोक वजन कमी करताना खाणे-पिणे देखील बंद करतात, जे खूप धोकादायक असू शकते. त्यामुळे अन्न वगळण्याऐवजी चांगले अन्न खा आणि कॅलरी कमी घ्या. वजन कमी करताना पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे सेवन करा, जेणेकरून शरीरात त्यांची कमतरता भासणार नाही. प्रथिनेयुक्त अन्न खा, म्हणजे स्नायूंची झीज होणार नाही आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :सोशल मीडियावेट लॉस टिप्ससोशल व्हायरल