चपाती आणि भात खाणं हे संतुलित आहाराचा एक पौष्टीक भाग आहे (Healthy Lifestyle). भात किंवा चपाती खाल्ल्याने आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. शिवाय पोट भरल्यासारखं वाटतं (Weight Loss). यामुळे आपण उलट - सुलट खाणंही टाळतो. गहू आणि तांदुळाचे देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत (Fitness). भात आणि चपाती या दोन्ही पदार्थांमध्ये वेगवेगळी पोषण मुल्य असतात (Chapati v/s Rice). पण असं म्हणतात चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते. हे कितपत खरं आहे? वेट लॉस जर्नीमध्ये भात आणि चपाती किती आणि केव्हा खावी?
या प्रश्नांची उत्तरं देताना फोर्टिस हॉस्पिटलचे सिनिअर आहार तज्ज्ञ अनुष्का बंदूर म्हणतात, 'जेव्हा आपण कमी कॅलरी खातो. तेव्हा वजन कमी होते. जेव्हा आपण भात आणि चपाती खातो. त्यात समान प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे पोर्शन कण्ट्रोलकडे अधिक लक्ष द्यायला हवे. दोन्ही खा पण प्रमाणात खा. यातून शरीराला फायदाच होईल'(Weight Loss: Is Eating Roti Better Than Eating Rice).
वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद
गव्हाची चपाती आणि भात खाण्याचे फायदे
- गहू आणि तांदुळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे दोन्ही कार्बोहायड्रेट्सचे मुख्य स्त्रोत आहे. जे शरीराला कार्य करण्यासाठी आणि सक्रीय राहण्यासाठी उर्जा प्रदान करते.
- भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण तसे नाही आहे. भात हा कमी चरबी, कमी साखर, ग्लूटेनमुक्त आणि ब जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीज आणि लोह यासारखे घटक देखील आहेत.
- आपल्याला जर वेट लॉस जर्नीदरम्यान भात सोडवत नसेल तर, पॉलिश न केलेले तांदूळ खा. शिवाय भात शिजत घालताना त्यात दालचिनी किंवा जिरे घाला. वजन कमी होईल. भात तयार करताना त्यात जास्त प्रमाणात डाळी किंवा भाज्या घातल्या तर उत्तम.
- गव्हाच्या एका चपातीमध्ये ५७ कॅलरी असतात. चपातीला तुप लावून खाल्ल्याने यामधील कॅलरी वाढतात. त्यामुळे तूप न लावता चपाती खा. मुख्य म्हणजे गव्हामध्ये आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यासह अनेक आजारांना दूर करणारे गुणधर्म असतात.
सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..
- पण भातापेक्षा चपाती खाल्ल्याने पोट लवकर भरते, कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय भातामध्ये प्रोटीन, कार्ब्स आणि फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे भात खाल्ल्यानंतर आपल्याला भूक लागू शकते.