Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight Loss : जिरे-ओवा-हळद-लिंबू-मध, घरच्याघरी 'असे' बनवा 5 डिटाॅक्स ड्रिंक

Weight Loss : जिरे-ओवा-हळद-लिंबू-मध, घरच्याघरी 'असे' बनवा 5 डिटाॅक्स ड्रिंक

वजन कमी करण्यासाठी प्या वेटलाॅस ड्रिंक्स.. 5 प्रकारच्या वेटलाॅस ड्रिंक्सनं वजन होतं झटपट कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2022 02:07 PM2022-06-16T14:07:26+5:302022-06-16T14:08:46+5:30

वजन कमी करण्यासाठी प्या वेटलाॅस ड्रिंक्स.. 5 प्रकारच्या वेटलाॅस ड्रिंक्सनं वजन होतं झटपट कमी 

Weight Loss: loose weight with Homemade weightloss drinks. 5 detox water help for weightloss | Weight Loss : जिरे-ओवा-हळद-लिंबू-मध, घरच्याघरी 'असे' बनवा 5 डिटाॅक्स ड्रिंक

Weight Loss : जिरे-ओवा-हळद-लिंबू-मध, घरच्याघरी 'असे' बनवा 5 डिटाॅक्स ड्रिंक

Highlightsजीरे, ओवा, हळद, आलं, लिंबू आणि मध या स्वयंपाकघरात उपलब्ध होणाऱ्या घटकातून सोप्या पध्दतीनं वेटलाॅस ड्रिंक्स ( वेटलाॅस ड्रिंक्स) तयार करता येतात.

वजन कमी करण्यासाठी काय खायचं प्यायचं नाही याची यादी भली मोठी असते. खरंतर ही यादी पाहूनच वजन कमी करण्याच्या प्रयत्नातून माघार घेतली जाते. वजन कमी करण्यासाठी (weightloss) आहाराची पथ्यं पाळावी लागतात हे खरं पण पथ्यं म्हणजे न खाणं असं नव्हे. तर आहारात काही गोष्टींचा मुद्दाम समावेश करणं हा देखील पथ्याचाच भाग. वजन कमी करण्यासाठी विशिष्ट पेयांचा उपाय करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. ही पेयं स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सामग्रीतून सहज तयार करता येतात. जीरे, ओवा, हळद, आलं, लिंबू आणि मध या स्वयंपाकघरात उपलब्ध होणाऱ्या घटकातून सोप्या पध्दतीनं वेटलाॅस ड्रिंक्स ( weightloss drinks) तयार करता येतात.  हे सर्व वेटलाॅस ड्रिंक्स सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

Image: Google

जिऱ्याचं पाणी

जिऱ्याचं पाणी सेवन केल्यानं चयापचय क्रिया सुधारते. पचन क्रिया व्यवस्थित होते. जिऱ्याचं पाणी तयार करण्यासाठी एका ग्लासभर पाण्यात एक मोठा चमचा जिरे  रात्रभरेअ भिजत घालावेत. सकाळी हे पाणी गाळून घ्यावं. गाळलेलं पाणी एका भांड्यात ठेवून मंद आचेवर गरम करावं. पाण्याला एक ते दोन उकळ्या येवू द्याव्यात. नंतर हे पाणी ग्लासमध्ये काढून घ्यावं. त्यात चिमूटभर सैंधव मीठ घालावं. हे पाणी गरम असतानाच प्यावं.

Image: Google

ओव्याचं पाणी

जिऱ्यांप्रमाणेच ओवाही पचन सुधारण्यासाठी उपयोगी असतो. ओव्यामुळे चयापचय क्रिया सुधारुन वजन झपाट्यानं कमी होतं. ओव्याचं पाणी दोन पध्दतीनं करता येतं. एक ग्लास पाणी घ्यावं. त्यात एक चमचा ओवा घालून हे पाणी चांगलं उकळावं. पाण्याला उकळी आली की गॅस बंद करावा. पाणी गाळून घ्यावं. त्या पाण्यात लिंबाचा रस आणि सैंंधव मीठ घालावं. आवडत असल्यास थोडासा गूळही घालावा. हे पाणी हलवून प्यावं. किंवा जिऱ्याप्रमाणे ओवाही रात्रभर पाण्यात भिजत घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी गाळून उकळून घ्यावं. गरम पाण्यात थोडा लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि थोडा गूळ घालावा. ओव्याचं पाणी गरम असतानाच प्यावं.

Image: Google

हळदीचं पाणी

हळदीचा फायदा केवळ आरोग्यालाच होतो असं नाही तर सौंदर्याच्या दृष्टीनेही हळदीला महत्व आहे. वजन कमी करण्यासोबतच हळदीमुळे त्वचेशी निगडित समस्या दूर होतात. हळदीचं पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात 2 कप पाणी घ्यावं. त्यात एक चिमूटभर हळद घालावी. पाणी एका कपापेक्षाही जास्त आटेल इतकं उकळावं.  पाण्याला उकळी आली की त्यात थोडी दालचिनी घालावी. पाणी निम्म्यापेक्षाही कमी झालं की ते ग्लासमध्ये ओतावं. यातला दालचिनीचा तुकडा काढून घ्यावा. पाणी कोमट झालं की मग प्यावं.

Image: Google

आलं आणि लिंबाचं पाणी

आलं लिंबाच्या पाण्यामुळे वजन कमी होतं. सोबतच शरीरावरची सूज कमी होते, मळमळ, ॲसिडिटी, पचनाच्या समस्या कमी होतात. आलं लिंबाचं पाणी तयार करण्यासाठी एका ग्लास गरम पाणी घ्यावं. या पाण्यात लिंबू पिळावा. यात आल्याचा तुकडा घालावा किंवा आल्याचा रस घालावा. या पाण्याचा स्वाद आणि औषधी गुणधर्म वाढवण्यासाठी यात थोडी दालचिनी पावडर घालावी. 

Image: Google

लिंबू मध पाणी

लिंबू मध पाणी हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं. रोज सकाळी एक ग्लास लिंबू मध पाणी घेतल्यास रोगप्रतिकाशक्ती वाढते. वजन कमी करण्यासाठी लिंबू मध पाणी करताना एक कप गरम पाणी घ्यावं. त्यात अर्ध्यापेक्षा कमी लिंबू पिळून घालावा. एक मोठा चमचा मध घालावं. हे पाणी हलवून घ्यावं. ते थोडं कोमट असतानाच प्यावं.
 

Web Title: Weight Loss: loose weight with Homemade weightloss drinks. 5 detox water help for weightloss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.