Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

Weight loss : भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 07:11 PM2021-07-21T19:11:22+5:302021-07-21T19:20:19+5:30

Weight loss : भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

Weight loss : Obesity is on the rising, what are the overweight symptoms? | Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

Weight loss : लठ्ठपणा वाढतो आहे, हे ओळखण्याची वजनापलिकडची लक्षणं कोणती?

Highlightsआपले बीएमआय, शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी इतर अनेक सूचक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे महत्त्वाचे ठरते.डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार जगभरात 1975 पासून लठ्ठपणा वाढण्याच्या वारंवारतेत 3 पटीने वृद्धी झाली.

लोकांनी न्यू नॉर्मल जीवनशैली आत्मसात केली असली तरीही वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल शिक्षण पद्धतीने मोठ्या व्यक्ती आणि बालकांमध्ये अति खाणे, तणावामुळे अति खादाडपणा तसेच वजन वाढण्याच्या समस्या वाढल्या आहेत. कोविड उद्रेकाने प्रत्येकाला चांगले आरोग्य, आहार आणि बळकट प्रतिकार शक्ती कमावण्याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे सुदृढता राखण्यावर तसेच घरीच आरोग्याची देखरेख ठेवण्याकडे कल राहिला.

भारतात लठ्ठपणाचा आलेख चढा असल्याने आरोग्य विषयक समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली. 2010 आणि 2040 दरम्यान लठ्ठविकारग्रस्तांच्या आकडेवारीत तिप्पट वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. याचा अर्थ आपल्या लोकसंख्येच्या 30% व्यक्ती लठ्ठ असू शकतात. आयसीएमआर-इंडियाबी’ ने 2015 दरम्यान केलेल्या अभ्यासानुसार 135 दशलक्ष व्यक्ती लठ्ठपणा आणि वजन व्यवस्थापन समस्येने त्रस्त आहेत. डिसेंबर 2020 दरम्यान प्रकाशित करण्यात आलेल्या 5 व्या राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्व्हेक्षणानुसार, बहुसंख्य महिला लठ्ठपणाच्या विकाराने त्रस्त आहेत आणि ग्रामीण भागांमध्ये ही आरोग्य समस्या वेगाने वाढते आहे.

यासंदर्भात ओमरॉन हेल्थकेअर इंडिया’ चे  व्यवस्थापकीय संचालक मसानोरी मत्सुबारा म्हणाले की, “लठ्ठपणा आणि जीवनशैलीविषयक आजार एकमेकांशी संबंधित आहेत.  ज्यामुळे आपल्या आरोग्यनिगा यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला. प्रामुख्याने वैयक्तिक स्तरावर प्रतिबंधात्मक काळजी घ्यायला हवी. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने वजन व्यवस्थापन हा मुख्य निकष असल्याचे आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते. मात्र ते पुरेसे नाही.

आपले बीएमआय, शरीराचे वयोमान, चरबीचे प्रमाण, स्नायूंची घनता इत्यादी इतर अनेक सूचक घटकांची शरीरातील हालचाल टिपणे महत्त्वाचे ठरते. आता हे घटक सहज आरामात घरबसल्या मोजणे शक्य आहे. बॉडी कम्पोजीशन मॉनिटर्स’ सारख्या देखरेख उपकरणामुळे हे शक्य होते. तशी उपकरणं आता अद्ययावत उपलब्ध आहेत.”

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) म्हणजे शरीराच्या घनतेवरून लठ्ठपणाचा वेध घेता येतो.  भारतात शरीराचा बीएमआय 30 किंवा त्याच्यावर असल्यास लठ्ठपणा आणि 25-30 बीएमआय असल्यास अति वजन असण्यावर शिक्कामोर्तब होतो. आपल्या शरीरात कमरेच्या खालच्या भागातील अवयवांच्या भोवती जमलेली चरबी म्हणजे बीएमआय संबंधी चरबी होय.

उच्च बीएमआय आणि सभोवती साठलेली चरबी म्हणजे हृदय रोग, उच्च रक्त दाब, श्वसनाच्या समस्या आणि अन्य विकारांना आमंत्रित करणारी भयंकर जोखीम ठरते. या सूचकांची माहिती आणि या घटकांचे व्यवस्थापन केल्याने अधिक प्रभावीपणे वजन व आरोग्य व्यवस्थापन शक्य होते. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार जगभरात 1975 पासून लठ्ठपणा वाढण्याच्या वारंवारतेत 3 पटीने वृद्धी झाली.
 

Web Title: Weight loss : Obesity is on the rising, what are the overweight symptoms?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.