Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मुगाचा हिरवागार प्रोटीनफुल डोसा, वजन वाढण्याची भीतीच विसरा-डाएटसाठी पोटभर नाश्ता...

मुगाचा हिरवागार प्रोटीनफुल डोसा, वजन वाढण्याची भीतीच विसरा-डाएटसाठी पोटभर नाश्ता...

Try This Protein-Packed Breakfast To Lose Those Extra Pounds : वजन कमी करायचं म्हणून काहीजण नाश्ताच करत नाही, पण तसं न करता खा पौष्टिक-पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2023 09:09 PM2023-06-01T21:09:39+5:302023-06-01T21:22:22+5:30

Try This Protein-Packed Breakfast To Lose Those Extra Pounds : वजन कमी करायचं म्हणून काहीजण नाश्ताच करत नाही, पण तसं न करता खा पौष्टिक-पोटभर

Weight loss Recipes Green Gram Dosa,High Protein Breakfast - Healthy Recipes | मुगाचा हिरवागार प्रोटीनफुल डोसा, वजन वाढण्याची भीतीच विसरा-डाएटसाठी पोटभर नाश्ता...

मुगाचा हिरवागार प्रोटीनफुल डोसा, वजन वाढण्याची भीतीच विसरा-डाएटसाठी पोटभर नाश्ता...

आपल्यापैकी बरेचजण सध्या वजन वाढीच्या समस्येने हैराण असलयाचे दिसून येते. वजन सतत वाढत राहण्याच्या चिंतेमुळे आपल्याला कोणत्या वेळी काय खावे आणि काय खाऊ नये असे अनेक प्रश्न पडतात. वजन केल्यावर वजन काटा जेव्हा सारखाच उजवीकडे वळत असेल तर नेमकं काय करावं अशी चिंता सतावते. अशावेळी आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत काय काय खायचे याचे प्लॅनिंग करतो. वजन कमी करायचे असल्यास आपल्याला सर्वप्रथम आहारात थोडे बदल करावे लागतात. आहारात बदल करण्यासोबतच आपल्याला शारीरिकदृष्टया हेल्दी खाण्यावर जास्त भर दिला पाहिजे. 

वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात आपण पौष्टिक डोसे, वाफवलेली इडली, ओट्स असे अनेक कमी कॅलरीज देणारे पदार्थ जातो. परंतु हे पदार्थ खाताना काही ठराविक काळानंतर तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. अशावेळी नेमकं काय करावं हे समजत नाही. तसेच एक दिवस डाएटला ब्रेक देऊन वेगळं दुसरं काही खायचं म्हटलं तर एक्स्ट्रा कॅलरीज पुन्हा शरीरात जाण्याची भीती असतेच. अशावेळी काहीतरी हेल्दी पण खायला हवे असते आणि एक्स्ट्रा कॅलरीज पण नको असतात. हेल्दी खाण्यासाठी आपण हिरव्या मुगाचे पौष्टिक डोसे सहज घरच्या घरी बनवू शकतो(Weight loss Recipes Green Gram Dosa,High Protein Breakfast - Healthy Recipes). 

साहित्य :- 

१. हिरवे मूग - १ कप 
२. कढीपत्ता - ५ ते ६ पाने 
३. लसूण पाकळ्या - ६ ते ७ 
४. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ 
५. पालक प्युरी - १/२ कप 
६. मीठ - चवीनुसार 
७. पाणी - गरजेनुसार 
८. तेल - ४ तर ५ टेबलस्पून 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या बाऊलमध्ये हिरवे मूग घेऊन ते पाण्याचे ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. 
२. हिरवे मूग स्वच्छ धुवून झाल्यावर मूग संपूर्ण भिजतील इतके पाणी त्यात घालून मूग रात्रभर किंवा ५ ते ६ तासांसाठी भिजवून घ्यावेत.
३. मूग संपूर्णपणे भिजून थोडे फुलून आल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे मग त्यात कढीपत्ता, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि पालकची प्युरी घालून हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून त्याचे डोशासारखे पीठ तयार करून घ्यावे. 
४. आपल्या सोयीनुसार पिठात पाणी घालून पीठ घट्ट किंवा पातळ करून घ्यावे. 
५. सगळ्यात शेवटी या पिठात मीठ घालून घ्यावे. 
६. आता एक पॅन गॅसवर ठेवून थोडा गरम करून घ्यावा. पण गरम झाल्यानंतर त्यावर चारही बाजूनी तेल सोडून घ्यावे. 
७. संपूर्ण पॅनला तेल लावून घेतल्यानंतर चमच्याने हे पीठ तव्यावर डोशासारखे गोल पसरवून घ्यावे. 
८. आता या मुगाच्या डोशाला दोन्ही बाजुंनी तपकिरी रंग येईपर्यंत तेलावर खरपूस भाजून घ्यावा.  

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

मुगाचा डोसा खाण्यासाठी तयार आहे, हा गरमागरम डोसा हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.

Web Title: Weight loss Recipes Green Gram Dosa,High Protein Breakfast - Healthy Recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.