Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचंय? हा एक खास चहा प्या, फॅट लॉस- इंचेस लॉससाठी अतिशय उपयुक्त 

वजन कमी करायचंय? हा एक खास चहा प्या, फॅट लॉस- इंचेस लॉससाठी अतिशय उपयुक्त 

Special Tea For Weight Loss: चहा प्यायला आवडतोच ना? मग वजन कमी करण्यासाठी हा एक खास चहा प्या.. फॅट लॉस- इंचेस लॉस (fat loss and inches loss) या गोष्टी होतील आणखी सोप्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2022 08:01 AM2022-06-26T08:01:15+5:302022-06-26T08:05:01+5:30

Special Tea For Weight Loss: चहा प्यायला आवडतोच ना? मग वजन कमी करण्यासाठी हा एक खास चहा प्या.. फॅट लॉस- इंचेस लॉस (fat loss and inches loss) या गोष्टी होतील आणखी सोप्या..

Weight Loss Remedies, special tea for weight loss, simple solution for weight loss, Uses of apple tea | वजन कमी करायचंय? हा एक खास चहा प्या, फॅट लॉस- इंचेस लॉससाठी अतिशय उपयुक्त 

वजन कमी करायचंय? हा एक खास चहा प्या, फॅट लॉस- इंचेस लॉससाठी अतिशय उपयुक्त 

Highlightsआहे ते वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा वेटलॉस, इंचेसलॉस करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा..

बैठं काम आणि त्यातही कामाचे वाढलेले तास, जेवणाच्या सवयीत झालेला बदल आणि त्यांच्या वेळांमध्ये असणारी कमालीची अनियमितता, व्यायामाचा एकतर कंटाळा किंवा मग अजिबातच वेळ नसणे... या सगळ्या गोष्टींचा एकत्रितपणे व्हायचा तोच परिणाम होतो आणि मग वजनाचा काटा झरझर उजवीकडे पळत सुटतो. एकदा का या काट्याने वेग घेतला की मग तो कंट्रोलमध्ये (how to control weight) ठेवणं मग खूपच अवघड होऊन जातं. म्हणूनच तर आहे ते वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा वेटलॉस (weight loss), इंचेसलॉस (inches loss) करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा..(use of apple tea for weight loss)

 

अर्थात हा उपाय केला म्हणजे आता वजन झरझर कमी होणार, असं समजू नये. कारण वजन कमी करायचं असेल तर सगळ्यात मुख्य बदल आहारात आणि तुमच्या रुटीनमध्ये करणं गरजेचं आहे. पण असा बदल करूनही किंवा व्यायाम करूनही अपेक्षेनुसार वजन कमी होत नाही, असं वाटत असेल तर त्याच्या जोडीला हा एक चहा तुम्ही घेऊ शकता. वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत हा चहा नक्कीच तुमची मदत करेल. ग्रीन टी, लेमन ट्री, हर्बल टी असे चहाचे प्रकार तुम्ही ऐकले असणारच. आता याच्या जोडीला ॲपल टी घेऊन पहा. विदेशात चांगलाच प्रचलित असणारा हा चहा आपल्याकडेही आता बरेच लोक घेत आहेत. 

 

कसा करायचा ॲप्पल टी?
ॲप्पल टी करण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात दोन कप पाणी घ्या आणि ते गॅसवर ठेवून मंद आचेवर गरम होऊ द्या. जेव्हा पाणी गरम होईल, तेव्हा त्यात चहाची बॅग आणि लिंबाचा रस टाका. पाण्याला उकळी आली की त्यात जवळपास अर्ध्या सफरचंदाचे तुकडे टाका. त्यानंतर त्यात दालचिनी- वेलची पावडर आणि एखादी लवंग टाका.  पुढचे आणखी २- ३ मिनिटं पाणी उकळू द्या. यानंतर गॅस बंद करा. हा चहा गाळून घ्या आणि रोज सकाळी रिकाम्यापोटी असा गरमागरम चहा प्या. या चहामध्ये जर गोडपणा हवा असेल तर चहा कपात गाळल्यानंतर त्यात एखादा चमचा मध टाकून पिऊ शकता. 

 

ॲप्पल टी पिण्याचे फायदे (Benefits of apple tea)
- ॲप्पल टी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. 
- वारंवार ॲसिडीटी होणे, कॉन्स्टीपेशन, असा त्रासही यामुळे कमी होतो.
- चयापचय क्रिया सुधारल्याने आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी साचणे कमी होते.
- दातांचा पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
- ॲप्पल टी बॉडी डिटॉक्स टी म्हणूनही ओळखला जातो.
- हा चहा प्यायल्याने ब्लड- शुगर लेव्हल नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेहींसाठीही हा चहा उपयुक्त ठरतो. 

 

Web Title: Weight Loss Remedies, special tea for weight loss, simple solution for weight loss, Uses of apple tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.