Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थंडीत रोज प्या आवळ्याचा चहा! तब्येत धडधाकट, वजन कमी: फायदेच फायदे आवळ्याचे..

थंडीत रोज प्या आवळ्याचा चहा! तब्येत धडधाकट, वजन कमी: फायदेच फायदे आवळ्याचे..

वजन कमी करण्यासाठी, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हर्बल टी पिण्याची सवय अनेकांना असते. जे वजन वाढीने त्रस्त आहेत त्यांनी हर्बल टीच्या ऐवजी आवळ्याचा चहा रोज नियमित पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात ते आवळ्यात असलेल्या गुणधर्मांमुळेच.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 02:28 PM2021-11-12T14:28:32+5:302021-11-12T16:49:13+5:30

वजन कमी करण्यासाठी, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हर्बल टी पिण्याची सवय अनेकांना असते. जे वजन वाढीने त्रस्त आहेत त्यांनी हर्बल टीच्या ऐवजी आवळ्याचा चहा रोज नियमित पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात ते आवळ्यात असलेल्या गुणधर्मांमुळेच.

Weight loss secret of Amla Tea: Alleged tension of increased weight? Take 2 cups of amla tea daily and decreased the tension of weight ! | थंडीत रोज प्या आवळ्याचा चहा! तब्येत धडधाकट, वजन कमी: फायदेच फायदे आवळ्याचे..

थंडीत रोज प्या आवळ्याचा चहा! तब्येत धडधाकट, वजन कमी: फायदेच फायदे आवळ्याचे..

Highlightsआवळ्याच्या चहामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. मानसिक तणाव हे देखील वजन वाढण्याचं मुख्य कारण आहे. आवळ्याचा चहा मानसिक ताणासोबतच नैराश्य या मानसिक आजारावरही उपयोगी ठरतो.आवळ्याचा चहा पिल्याने आपलं गंभीर आजारांपासून संरक्षण तर होतंच शिवाय या चहामुळे पचन क्रिया सुधारुन वजनही कमी होतं.

जर थंडीत व्यायाम पुरेसा केला नाही तर थंडी आणि वजन वाढणं हे समीकरण सगळ्यांनाच लागू पडतं. थंडीत वजन वाढू नये, वाढलेलं वजन कमी व्हावं, पोटाच्या भागाची चरबी कमी व्हावी यासाठी आवळ्याचा चह हा उत्तम पर्याय आहे. भारतीय गूजबेरी (झाडाला येणारं हिरवं छोटं फळ) अशी जगभरात आवळ्याची ओळख आहे. आवळ्यातील गुणधर्माचा वापर आरोग्यासाठी करुन घेण्याचे प्रयत्न नैसर्गिक आणि हर्बल प्रकारच्या उपचारांमधे केला जातो.

थंडी म्हणजे आवळ्यांचा हंगाम. पण आवळ्याचा उपयोग केवळ थंडीपुरताच मर्यादित नसून बाराही महिने आवळ्याच्या पदार्थांचं सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. विशेषत: वजन कमी करण्यासाठी, मधुमेहात रक्तातील साखर कमी करण्यासाठी, साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा आणि त्यातही आवळ्याच्या चहाचा खूप उपयोग होतो. आवळा केवळ वजन कमी करतो असं नाही तर अनेक आजारांपासून आरोग्याचं रक्षणही करतो.

Image: Google

आवळ्यातील औषधी गुणधर्मांचा परिचय हजारो वर्षांपासून आहे. पण वजन कमी करण्यासाठी , वजन नियत्रित ठेवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून ‘फिटनेस रेजिम’मधे आवळ्याचा दिमाखाने समावेश झाला आहे. आंबट, तुरट थोडासा कडसर चवीचा आवळा आणि आवळ्याचे पदार्थ आपल्याला आपले फिटनेस गोल प्राप्त करुन देऊ शकतात यावर आता अनेकांचा विश्वास बसू लागला आहे. आवळा आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतो याला शास्त्रीय आधार आहे. यावर अनेक संशोधनं आणि अभ्यास झाले आहेत. या अभ्यासांच्या निष्कर्षांमुळेच आवळ्याकडे एक आरोग्यदायी फळ म्हणून बघण्याची नजर जगास मिळाली आहे.

वजन कमी करण्यासाठी आवळ्याचा चहा?

वजन कमी करण्यासाठी, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हर्बल टी पिण्याची सवय अनेकांना असते. जे वजन वाढीने त्रस्त आहेत त्यांनी हर्बल टीच्या ऐवजी आवळ्याचा चहा रोज नियमित पिण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात ते आवळ्यात असलेल्या गुणधर्मांमुळेच. आवळ्याच्या चहाने चयापचय क्रिया सुधारुन वजन लक्षणियरित्या कमी होतं.

Image: Google

आवळ्यामधे अँण्टिऑक्सिडण्टस, पॉलिफेनॉल्स, क जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. या गुणधर्मांमुळे आवळा शरीरातील अपायकारक विषारी घटक बाहेर काढण्यास उपयुक्त ठरतो. वजन कमी करण्यासाठी कॅलरीचं गणित जुळवून आणणं आवश्यक असतं. कमी कॅलरीचा आहार घेणं किंवा जितकी कॅलरी आहारातून शरीरात गेली आहे ती वापरणं, तिचं ज्वलन होणं हे जर घडलं तरच वजन कमी होतं, नियंत्रित राहातं. आवळा हे फळ असं आहे ज्यात कॅलरीचं प्रमाण कमी आहे आणि वजन कमी करण्यासही आवळा फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासोबाच आवळ्यातील अँण्टिऑक्सिडण्टस हे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. आवळ्याचा चहा रोगांचा शरीरात संसर्ग होण्यापासून ,जीवाणू आणि विषाणूंचा संसर्ग होण्यापासूनही बचाव करतो.
आवळ्याचा चहा पिल्याने शरीर विषमुक्त होण्यास मदत होते. या चहामुळे शरीरात असलेले सर्व विषारी घटक बाहेर पडतात. यामुळे आपलं गंभीर आजारांपासून संरक्षण तर होतंच शिवाय या चहामुळे पचन क्रियाही सुधारते.

मानसिक तणाव हे देखील वजन वाढण्याचं , आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण आहे. आवळ्याचा चहा मानसिक ताणासोबतच नैराश्य या मानसिक आजारावरही उपयोगी ठरतो. आवळ्याचा चहा नियमित पिल्याने मन शांत राहातं. शरीरात दिवसभर ऊर्जा आणि उत्साह टिकून राहातो. आवळ्याच्या चहामुळे शरीरातील पेशी खराब होण्याची क्रिया थांबते. यामुळे आवळ्याचा चहा पिल्याने कन्सरचा धोकाही कमी होतो.

Image: Google

आवळ्याचा चहा कसा करावा?

आवळ्याचा चहा करणं ही अतिशय सोपी कृती आहे. आवळ्याचा चहा करताना एका भांड्यात दोन कप पाणी घालावं. पाण्याला उकळी काढावी. उकळी आली की त्यात एक चमचा आवळ्याची पावडर, थोडं किसलेलं आलं, 2-3 तुळशीची, 2-3 पुदिन्याची पानं घालून मिश्रण चांगलं ढवळून घ्यावं. चहाला पुन्हा एकदा चांगली उकळी काढावी. आणि चहा गाळून घ्यावा. त्यात मध घालून तो प्यावा. रोज दोन कप आवळ्याच चहा वजन वाढीवर उत्तम उपाय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. तसेच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, ज्यांना रक्तातील साखर आणि वजन दोन्ही नियंत्रित करायचं आहे त्यांनी आवळ्याच्या चहात साखर आणि मध काहीच न घालता प्यावा असा सल्लाही ते देतात.

Web Title: Weight loss secret of Amla Tea: Alleged tension of increased weight? Take 2 cups of amla tea daily and decreased the tension of weight !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न