वजन कमी करणं सोपं काम नाही (Fitness Tips). यासाठी स्ट्रिक्ट डाएट आणि हेवी व्यायाम करावा लागतो. कमी मेहनतीत तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आयुर्वेदीक उपायांनी वजन कमी करू शकता. कडुलिंबात अनेक औषधी गुण असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (Weight Loss Tips) जर तुम्हीसुद्धा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर कडुलिंबाच्या फुलाचा वापर करून तुम्ही वजन कमी करू शकता. आयुर्वेदीक तज्ज्ञांनी कडुलिंबातील आयुर्वेदीक गुणांबद्दल सांगितले आहे. (How Neem Flower Can Burn Belly Fat Weight Loss Diet Against Obesity)
न्युट्रिशनिस्ट निखिल वत्स सांगतात की यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होऊन अन्न पचण्यास मदत होते. यामुळे शरीरातील कॅलरीज सहज बर्न होतात. कडुलिंबाचे सेवन करणं तब्येतीसाठी उत्तम मानलं जातं. खासकरून कडुलिंबाच्या फुल त्वचेपासून शरीराचे अनेक त्रास दूर करण्यास प्रभावी ठरते. कडुलिंबामुळे तुमची हंगर क्रेव्हिंग नियंत्रणात राहते आणि भूकेवर नियंत्रणात मिळवता येतं. कडुलिंबात फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे डायजेशन चांगले राहते आणि पोट दीर्घकाळ भरलेलं राहण्यास मदत होते.
कडुलिंबाच्या पानांनी वजन कसे कमी करावे?
सायसेंन्स डायरेक्टच्या रिपोर्टनुसार Azadiractta indica म्हणजेच कडुलिंबाच्या पानात दाहकविरोधी, इम्युनोस्टिमुयलंट हेपॅटोप्रोटेटिव्ह आणि हायपोग्लायसेमिक गुण असतात. कडुलिंबाच्या पानांचे औषधी महत्वही आहे. कडुलिंब हे फ्लेव्होनॉईड्स, टेरपेनॉईड्स, टॅनिन, सॅपोनिन्स, अल्कलॉड्चा समृद्ध स्त्रोत आहे. ज्यामुळे मधुमेह नियंत्रात राहतो आणि वजनही नियंत्रणात ठेवता येते.
कडुलिंबाच्या फुलानं वजन कसे कमी करावे?
रोज सकाळी उठून ताजी फुलं तोडून रिकाम्या पोटी याचे सेवन करा. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाचे फूल आणि मधाचे सेवन करू शकता. सगळ्यात आधी कडुलिंबाचे फुल खलबत्त्यात व्यवस्थित वाटून घ्या. यात १ चमचा मध मिसळा यासोबतच अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळू शकता.
सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो? डॉक्टर सांगतात १ उपाय, फ्रेश वाटेल- एनर्जेटीक राहाल
सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करा. वजन कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या फुलांच्या चहासुद्धा फायदेशीर ठरतो. हा चहा तयार करण्यासाठी १ कप पाण्यात कडुलिंबाच्या फुलं उकळून यात आल्याचा रस घालून मिक्स करून प्या. संपूर्ण दिवसात १ कप या चहाचे सेवन करा.