Join us

रात्रीच्या जेवणानंतर ७ गोष्टी करा; जीमला न जाता भराभर वजन होईल कमी, दिसाल फिट-मेंटेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:18 IST

Weight Loss Start Doing These 7 Things After Dinner : वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे ते  समजून घेऊया.

वजन (Weight Loss) कमी करण्याचे अनेक मार्ग असू शकतात. तुम्ही काय खाता, कसं खाता खाल्ल्यानंतर काय करता अशा छोट्या छोट्या गोष्टींचा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेवरही परिणाम होतो. तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर काय करता ज्यामुळे तुमचं वजन  कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणानंतर काय करावे ते  समजून घेऊया. (Weight Loss Start Doing These 7 Things After Dinner Weight Will Start Reducing Immediately)

१) रात्रीचं जेवण केल्यानंतर लगेच झोपायला जाऊ नका यामुळे पचनक्रिया संथ होते आणि वजन वाढू शकते. रात्रीच्या जेवणानंतर २० ते ३० मिनिटं चालायला जा. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि कॅलरीज बर्न होतात.

२) पाणी प्यायल्यानं पचनक्रिया चांगली राहते. शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर हायड्रेट राहते. ग्रीन टी मध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो.

३) टिव्ही बघताना तुम्ही विचार न  करता खात असाल तर यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते. मोबाईल फोन स्क्रोल करत राहिल्यानं तुम्ही खाण्याचा आनंद घेऊ शकत नाही आणि जास्त खाता.

४) ७ ते ८ तासांची झोप पूर्ण करा. वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं असतं ज्यामुळे हॉर्मोन असंतुलन होतं आणि भूक वाढते.

हळदी कुंकवासाठी ५० रुपयांपेक्षा कमी किमतीत घ्या सुंदर दागिने, वाण असे की सर्वांना आवडेल

५) ताण-तणावामुळे तुमच्या आहारावर परीणाम होतो. योग, मेडिटेशन, अन्य ताण-तणाव कमी करण्याच्या एक्टिव्हीटीजची प्रॅक्टीस करा.

६) आहारात फायबर्सयुक्त पदार्थ प्रोटीन्स, हेल्दी फॅट्सचा समावेश करा. प्रोसेस्ड कार्बोहायड्रेट्सचे सेवन करू नका, तांदूळ, ब्रेड, पेस्ट्री यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

कंगव्यात केसांचे भरपूर पुंजके अडकतात? ३ उपाय, १ आठवड्यात केस वाढतील-दाट होतील

७) हळूहळू अन्न चावून खा, मोठ्या भागात न खाता छोट्या छोट्या भागांमध्ये अन्न चावून खा, जेवल्यानंर ब्रश करा. जेणेकरून तुमची काहीही खाण्याची इच्छा होणार नाही

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स