Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

3 Common Mistakes In Weight Loss Journey: प्रयत्न करूनही वजन कमीच होत नसेल तर एकदा या काही चुका तुम्ही करता का, एकदा तपासून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 03:51 PM2023-10-13T15:51:49+5:302023-10-13T15:55:56+5:30

3 Common Mistakes In Weight Loss Journey: प्रयत्न करूनही वजन कमीच होत नसेल तर एकदा या काही चुका तुम्ही करता का, एकदा तपासून घ्या...

Weight Loss Tips: 3 Common mistakes in weight loss journey | कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

कितीही प्रयत्न केला तरी वजन कमीच होत नाही? पाहा हमखास करताय या ३ चुका

Highlightsवजन कमी करताना या ३ चुका करणं टाळा

वेटलॉसच्या प्रयत्नात जे कुणी आहेत, त्यांना हा अनुभव कधी ना कधी येतोच...वजन कमी करताना खूपच जास्त प्रयत्न करावा लागतो. पण खाण्यापिण्यात थोडीशी जरी चूक  झाली तरी मात्र लगेचच वजनाचा आधीचा आकडा गाठल्या जातो. असं झालं की मग व्यायामाचा, डाएटिंगचा सगळाच उत्साह चालला जातो (Weight Loss Tips). असा अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनाच येतो. मग शेवटी आपण सगळंच सोडून देतो आणि स्वत:चं वजन आणखी वाढवून घेतो. हे सगळं टाळायचं असेल तर वजन कमी करताना या ३ चुका करणं टाळा (3 Common Mistakes In Weight Loss Journey). 

 

वजन कमी करताना तुम्हीही ३ चुका करता का

१. आजचं उद्यावर ढकलणे

कोणत्याही कारणाने व्यायामाचा किंवा डाएटिंगचा उत्साह गेला तर आपल्याला परत रुटीनवर यायला खूप त्रास होतो.

गरबा खेळताना ओढणी सारखी मधेमधे येते? बघा दुपट्टा कॅरी करण्याच्या ३ हटके स्टाईल, बिंधास्त खेळा गरबा

आज करू, उद्या करू किंवा अमूक एका तारखेला, पुढच्या महिन्याच्या १ तारखेपासून व्यायाम करू अशी अनेक कारणं आपण स्वत:ला देतो. तो पुढचा दिवस कधीच उगवत नाही. त्यामुळे उद्या करू- परवा करू असं म्हणत व्यायाम करणं पुढे ढकलू नका.  अगदी आजचं आणि आताचं मुहूर्त पाहून पुन्हा व्यायामाला सुरूवात करा.

 

२. फक्त वेटलॉस हा एकच उद्देश नको

वेटलाॅस या प्रक्रियेकडे फक्त वजनाचा काटा खाली आणणे या भुमिकेतून पाहू नका. वेटलॉस तेव्हाच उपयोगी ठरतो जेव्हा त्यामुळे तुमच्या तब्येतीत काही सुधारणा जाणवते.

साबुदाण्याची खिचडी करताना ५ चुका टाळा, मोत्यासारखा टपोरा- मोकळा दिसेल साबुदाणा- खिचडी होईल मऊसूत

मग ती थकवा कमी येणे, उत्साही वाटणे, पचन चांगले होणे, कोणत्याही प्रकारचं दुखणं कमी होणे अशा अनेक गोष्टींशी निगडीत असते. तुमच्या तब्येतीत काही सुधारणा झाली पण त्यावेळी वजनाचा काटा मात्र जशास तसाच असेल, तरीही तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात हे लक्षात घ्या. 

 

३. खूप अवघड गोष्टी करू नका

डाएटवर आहात म्हणजे वेगळेच कोणते तरी, कधीही न ऐकलेले पदार्थ खायचे, औषधी प्यायची असं नाही.

मेंदूचा विकास होण्यासाठी मुलांकडे ही ४ खेळणी असायलाच पाहिजेत, वाचा बालरोगतज्ज्ञांचा सल्ला

जे तुम्हाला सहज करता येतील अशाच गोष्टी व्यायामात आणि डाएटमध्ये करा. कारण अवघड गोष्टी थोडेच दिवस जमू शकतात. त्यामुळे आपलं नेहमीचं साधं अन्न योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीने घेतलं तरी वजन कमी हाेतं. 


 

Web Title: Weight Loss Tips: 3 Common mistakes in weight loss journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.