Join us  

पोट सुटलंय, मांड्या बेढब दिसतात? स्वयंपाकघरातील ५ पदार्थ; आजपासूनच खा, स्लिम, मेटेंन दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:40 AM

रात्रीची जेवणाची आणि झोपण्याची वेळ यात २ तासाचं अंतर असावं. कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्यानं वजन वाढ होते.

वजनवाढ (Weight Gain) ही सध्याची एक कॉमन समस्या झाली आहे. एकदा वजन वाढलं की कितीही प्रयत्न केले तरी कमी होत नाही. सतत बसून बसून पोटाचा घेर वाढत जातो. पोट, मांड्या, हातांचा घेर वाढला की शरीर बेढब दिसायला लागतं. वजन कमी करण्यासाठी नेहमी सक्रिय राहा. जेवल्यानंतर अजिबात हालचाल न केल्यास शरीरावरील फॅट्स वाढू शकतात.(Weight Loss Tips)म्हणूनच जेवल्यानंतर लगेच झोपणं टाळा. दिवसभरात तुम्ही कितीही थकला असाल तरी रात्रीची जेवणाची आणि झोपण्याची वेळ यात २ तासाचं अंतर असावं. कारण जेवल्यानंतर लगेच झोपल्यानं वजन वाढ होते. (4 Kitchen Ingredients That Helps Burn Belly Fat)

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला फॅन्सी डाएट आणि महागडे पॅक फूड खाण्याची काहीच गरज नाही. घरात ठेवलेले काही मसाले पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकता. (Weight Loss Tips) न्युट्रशनिस्ट रमिता कौर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. 

वजन कमी करण्याचे काही घरगुती उपाय तुम्हाला उत्तम परिणाम देऊ शकतात. न्युट्रिशनिस्ट सांगतात की आहारात वेलची, बडीशेप, काळी मिरी, आलं, हळद यांसारख्या मसाल्यांचा समावेश करायला हवा. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.( 4 Kitchen Ingredients That Helps Burn Belly Fat)

१) वेलची मेटाबॉलिझ्म वाढवते आणि पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करते. तुम्ही लंच किंवा डिनरमध्ये वेलचीच्या (Cardamom Water)  पाण्याचं सेवन करू शकता. 

रेस्टोरंटस्टाइल मऊ -मोकळा जीरा राईस कुकरमध्ये करा; सोपी ट्रिक, जीरा राईस होईल परफेक्ट

२) बडीशेपच्या बियांमध्ये फायबर असते, ज्यामुळे पोट भरलेले राहते. त्याच वेळी, ते चरबी जमा होण्यापासून रोखून बर्न करण्यास मदत करते. तुम्ही एका बडीशेपेचा चहा घेऊ शकता किंवा जेवणानंतर 1 चमचा कच्ची बडीशेप चघळू शकता.

३) काळी मिरी आणि आले दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात. यासाठी काळी मिरी, मध आणि लिंबाचा रस एकत्र करून सकाळी रिकाम्या पोटी प्या. तसेच, तुम्ही एका ग्लास पाण्यात १ इंच आल्याचा तुकडा उकळून सकाळी किंवा रात्रीच्या जेवणानंतर रिकाम्या पोटी पिऊ शकता.

बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसेपी

४) हळदीत अनेक औषधी गुणधर्म असतात. हळदीचा वापर करून तुम्ही वजनही कमी करू शकता. १ इंच कच्ची हळद किंवा १ चुटकी हळद (Turmeric Water) पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून सकाळी प्या. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स