Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा, असा प्रश्न पडला असेल तर राेजच्या आहारात या ५ पैकी काही पदार्थ नियमित खा.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 04:42 PM2022-06-04T16:42:22+5:302022-06-04T16:43:07+5:30

Food For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी काय उपाय करावा, असा प्रश्न पडला असेल तर राेजच्या आहारात या ५ पैकी काही पदार्थ नियमित खा.....

Weight Loss Tips: 5 food items that can helps to reduce belly fat and helps to burn calories | Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Food For Weight Loss: पोटावरची चरबी काही केल्या कमी होत नाही? 5 पदार्थ खा, पोट होईल कमी

Highlightsपचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुरळीत ठेवण्यासाठी आहारात हे काही पदार्थ नियमित घेतले पाहिजेत.

वजन कमी करण्यासाठी काय काय उपाय करावे, असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. कुणी व्यायामावर (exercise) भर देण्याचा प्रयत्न करतात तर कुणी आहारावर फोकस करतात. व्यायाम आणि आहार (diet) यांचा बॅलेन्स जर उत्तम पद्धतीने सांभाळला गेला तर नक्कीच वाढत्या वजनावर कंट्रोल करता येते. पण व्यायाम करण्याचा अनेकांना कंटाळा असतो आणि आहार घेताना काही चूका होतात. त्यामुळे पचनक्रिया, चयापचय (metabolism) क्रिया बिघडते आणि मग वजन आटोक्यात येणे अवघड होऊन जाते. म्हणूनच पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुरळीत ठेवण्यासाठी आहारात हे काही पदार्थ नियमित घेतले पाहिजेत. (food for weight loss)

 

वजन कमी करण्यासाठी आहारात असावेत.....
१. मशरूम

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मशरूम अतिशय उपयुक्त ठरतात. शिवाय मशरूममध्ये प्रोटीन्सचे प्रमाणही खूप जास्त असते. मशरूममध्ये असणारे काही घटक शरीराचे मेटाबाॅलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आपोआपच खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होते आणि  शरीरावर अतिरिक्त चरबी साचण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आठवड्यातून २ वेळा तरी मशरूम खावेत.
२. गाजर
गाजर हे लो कॅलरी डाएट म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे गाजर भरपूर प्रमाणात खाल्लं तरी त्यामुळे वजन वाढण्याचा त्रास होत नाही. शिवाय गाजरामध्ये २ ते ३ प्रकारचे फायबर असतात. हे फायबर पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे नुसते गाजर, गाजराची कोशिंबीर, गाजराचे सूप अशा वेगवेगळ्या पद्धतीने नियमितपणे गाजर खावे. 

 

३. अननस
अननस हे फळ पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि चयापचय क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. शिवाय अननसामध्ये फायबर आणि ॲण्टी इन्फ्लामेटरी गुण भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अननस आहारात नियमित घ्यावे. 
४. काकडी
काकडीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पोट स्वच्छ होण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी काकडी नियमितपणे खावी. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काकडी अतिशय उपयुक्त ठरते. काकडीमध्ये फायबर असल्याने पोट भरल्यासारखे वाटते. शिवाय कॅलरीज कमी असल्याने वजन वाढीचा धोकाही नसतो. त्यामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी काकडी खाणे उपयुक्त ठरते. 

 

५. सफरचंद
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे एक सफरचंद खाल्लं तरी भरपूर वेळ पोट भरल्यासारखे वाटते. तसेच सफरचंदामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे नाश्ता म्हणून रोज फक्त एक सफरचंद खाल्ल्यास वजन लवकर आटोक्यात आणण्यास नक्कीच मदत होईल. 
 

Web Title: Weight Loss Tips: 5 food items that can helps to reduce belly fat and helps to burn calories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.