Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : सगळे करुनही आपले वजन म्हणावे तसे कमी होतेच असे नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2022 03:58 PM2022-09-14T15:58:33+5:302022-09-14T16:13:29+5:30

Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : सगळे करुनही आपले वजन म्हणावे तसे कमी होतेच असे नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता.

Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : Losing excess weight is stressful; But don't make 5 mistakes, you won't lose weight, but... | वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

वजन कमी करायचं तर अजिबात करु नका ५ चुका; तज्ज्ञ सांगतात, वजन तर कमी होणार नाहीच, पण...

Highlightsखाणे हा गुन्हा आहे अशाप्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होण्याची शक्यता असते, मात्र ती योग्य नाही.आपण दिवसातला ठराविक वेळ व्यायाम करत असू आणि आपल्या डोक्यात त्याबाबत नकारात्मक विचार असतील तर त्याचा उपयोग होत नाही

वजन वाढलं की ते कमी करण्याचं एक आव्हान आपल्यापैकी अनेकांपुढे असते. कधी अनुवंशिकतेमुळे तर कधी बैठ्या कामामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे वजन वाढते. एकदा वजन वाढले की ते काही केल्या कमी होत नाही. मग हे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपण जीमला जातो तर कधी शक्य तितके चालतो. काही वेळा डाएट प्लॅन फॉलो करतो. मात्र हे सगळे करुनही आपले वजन म्हणावे तसे कमी होतेच असे नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आपली मानसिकता. वजन कमी करायचे या गोष्टीचा आपण ताण घेतलेला असतो आणि त्यादृष्टीने आपण मन मारत किंवा जबरदस्तीने काही गोष्टी करत जगत असतो. असे केल्याने आपले वजन तर कमी होत नाहीच पण ते आहे त्यापेक्षा जास्त वाढण्याची शक्यता असते (Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss). 

प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर आपल्या चाहत्यांना याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात. ऋजूता दिवेकर सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असतात,  इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कायम काही ना काही गोष्टी सांगत त्या आपल्य़ा चाहत्यांना जागरुक करत असतात. यामध्ये कधी एखादा माहितीपर व्हिडिओ असतो , तर कधी त्या स्वत:च काही आसने करुन दाखवतात. कधी नुसती लिखित स्वरुपातील माहिती देतात तर कधी त्या थेट आपल्या चाहत्यांशी संवाद साधतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे असंख्य फॉलोअर्स असून त्यांनी केलेल्या पोस्टला त्यावर अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. विशेष म्हणजे कित्येक जण त्यांच्या या पोस्टची आतुरतेने वाटही पाहत असतात. पाहूयात आताच्या वजन कमी करण्याच्या या पोस्टमध्ये अजिबात करु नयेत अशा कोणत्या ५ महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. 

१. हा एकच प्रोजेक्ट आहे असे वागू नका

वजन कमी करणे हे आपले मुख्य उद्दीष्ट असले तरी आपल्या आयुष्यात एवढे एकमेव ध्येय आहे असे वागू नका असे ऋजूता सांगतात. याशिवायही आयुष्यात अनेक गोष्टी असतात त्याकडेही तितकेच लक्ष द्या. 

(Image : Google)
(Image : Google)

२. अॅडाप्टेशन टाइममध्येच अपयश आले असे समजू नका 

आपण एखादी नवीन गोष्ट करतो तेव्हा शरीराला त्या गोष्टीशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ जावा लागतो. हा वेळ साधारणपणे १२ आठवडे म्हणजेच ३ महिन्यांचा असू शकतो. त्यामुळे डाएट, व्यायाम असे नव्याने काही करत असाल तर त्याला पुरेसा वेळ द्यायला हवा. 

३. शिक्षा म्हणून व्यायाम करु नका

केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर आरोग्य चांगले राहण्यासाठीही व्यायाम करणे अतिशय गरजेचे असते. एकीकडे आपण दिवसातला ठराविक वेळ व्यायाम करत असू आणि आपल्या डोक्यात त्याबाबत नकारात्मक विचार असतील तर मात्र त्या व्यायामाचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. त्यामुळे व्यायामाकडे सकारात्मकतेने पाहणे आवश्यक आहे. 

४. खाणे हा गुन्हा आहे असे समजू नका 

वजन कमी करायचे म्हणजे सगळ्यात आधी आपल्या खाण्या-पिण्यावर बंधने येतात. अशावेळी काय खायचे, किती खायचे, कसे खायचे, कोणत्या वेळेला खायचे याबाबतचे काही नियम आपण स्वत: ठरवतो किंवा तज्ज्ञांकडून याबाबतची माहिती घेतो. हे सगळे करत असताना खाणे हा गुन्हा आहे अशाप्रकारची भावना आपल्या मनात निर्माण होण्याची शक्यता असते, मात्र ती योग्य नाही.

५. प्रत्येक स्टेप, कॅलरी आणि किलोवर नजर ठेवू नका

वजन वाढत असल्याने आपण आपल्या प्रत्येक गोष्टीवर अतिशय बारकाईने लक्ष देतो. यामध्ये प्रत्येक घेत असलेल्या कॅलरी, चालत असलेली प्रत्येक स्टेप किंवा वजनाचा वाढीचा किंवा कमी होण्याचा वेग यावर बारकाईने लक्ष ठेवतो. मात्र असे केल्याने वजन कमी होण्यावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. 

Web Title: Weight loss Tips by Rujuta Divekar 5 Don’ts on Your Journey to Weight Loss : Losing excess weight is stressful; But don't make 5 mistakes, you won't lose weight, but...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.