आपली फिगर परफेक्ट, मेंटेन असावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. (Weight Loss Tips) त्यासाठी काहीही करण्याची लोकांची तयारी असते. पण कामाच्या गडबडीत स्वत:कडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वजन वाढत जातं. एकदा वजन वाढलं की ते कमी करायचं म्हटलं की खूप कष्ट घ्यावे लागतात. वजन कमी करण्यासाठी सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी काही सोपे उपाय सांगितले आहे. या उपायांचा रोजच्या जीवनात अवलंब केला तर वजन पटपट कमी होण्यासही मदत होईल. (Weight Loss Tips By Sadhguru Deserve a Try)
१) ताजे अन्नपदार्थ खा (Eat Fresh Food)
अन्न शरीराच्या कार्यासाठी महत्वाचे इंधन आहे. सद्गुरू सांगतात की जास्तीत जास्त ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. अन्न शिजवल्यानंतर जास्तीत जास्त १ ते दीड तासात ते खायला हवं. तुम्ही जितकं ताजं अन्न खाल तितकंच तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल.
२) फ्रुट डाएटचा आहारात समावेश करा (Include Fruits In Your Diet)
फळं खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. यामुळे पोषक तत्व शोषून घेतली जातात. ज्यामुळे शरीर आणि ब्रेन हेल्दी, निरोगी राहण्यास मदत होते.
३) कच्च्या भाज्या फळं खा (Row Fruits and Vegetable)
सद्गुरू सांगतात प्रत्येक सजिव वनस्पती अनेक फायदे देते. काही भाज्या शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व कमी होतात परिणामी शरीराला कमीत कमी एनर्जी मिळते. म्हणून काकडी, गाजर, मुळा अशा काही भाज्य कच्च्या खाण्याचा प्रयत्न करा.
ओटी पोट लटकतंय-चरबी कमी होईना? घरी ५ मिनिटांचा हा व्यायाम करा, महिन्याभरात स्लिम व्हाल
४) दिवसाला २ वेळा जेवणं पुरेसं आहे ( Eat 2 Times in Day)
अनेकांना दिवसभरात काहीना काही खाण्याची सवय असते. सद्गुरू सांगतात की दिवसातून फक्त २ वेळा व्यवस्थित जेवणं शरीरासाठी पुरेसं असतं. तरी तुम्ही वारंवार काही खात असाल तरी ५ तासांच्या अंतराने खा. शरीराला अन्न पचायला वेळ द्या.
कोण सांगतं व्हेज जेवणात प्रोटीन नसतं? ५ व्हेज पदार्थ खा, हाडांना दुप्पट प्रोटीन मिळेल-फिट राहाल
५) प्लांन्ट बेस्ड डाएट (Try to Eat Plant Based Diet)
आहारात जास्तीत जास्त शाकाहारी पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तब्येत चांगली राहते आणि तुम्हाला हेल्दी, निरोगी फिल होते. सद्गगुरूंनी प्लांट बेस्ड डाएटचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. आहारात मल्टीग्रेन्स म्हणजेच कडधान्य, ज्वारी, बाजरी, गहू अशा पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा. एक घास २४ ते २६ वेळा चावून खा. मधाचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते.