Join us  

Weight loss Tips : दिवसेंदिवस शरीर जास्तच बेढब होत चाललंय?? वाढलेली चरबी कमी करेल दालचिनीचा चहा, वाचा कसा ते

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 1:24 PM

Weight loss Tips : दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.

वजन वाढणं किंवा शरीरातील अतिरक्त चरबी वाढण्याची समस्या आजकाल सगळ्यांमध्येच उद्भवताना दिसतेय. लॉकडाऊनमुळे शारीरीक हालचालींचा अभाव, अनियमित जीवनशैली, झोपण्याच्या वेळा नियमित नसणं, मोबाईलचा वापर करत तासनतास बसून राहणं यामुळे वजन वाढतं तर कधी फॅट्स वाढतात. आता सण उत्सवांना सुरूवात झाली आहे. त्यामुळे खाण्यावर नियंत्रण ठेवणं सगळ्यांनाच जमतं असं नाही.

अशावेळी वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. दालचिनीचा चहा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम उपाय आहे.  सुगंधित मसाला दालचिनी, मॅंगनीज, लोह, फायबर, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के  समृद्ध आहे. हा मसाल्याचा पदार्थ जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये वापरला जातो. दालचिनी आरोग्याच्या फायद्यांसाठी ओळखली जातो. 

दालचिनीचा चहा वजन कमी करण्याासाठी फायदेशीर 

दालचिनीच्या चहात मोठ्या प्रमाणात पोषक तत्व असतात. त्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. याशिवाय एंटी इंफ्लेमेटरी  गुणांमुळे सुज कमी होण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅलरीज बर्न करण्यासाठी  दालचिनी फायदेशीर ठरते. 

पोषणतज्ज्ञ डॉ अंजू सूद यांनी एनडीटीव्ही फूडशी बोलताना सांगितले, "दालचिनी शरीरातील चयापचय दर वाढवू शकते. बऱ्याच वेळा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे इन्सुलिन प्रतिरोधक बनते, तेव्हा साखरेचे चयापचय होत नाही आणि त्याचे चरबीमध्ये रूपांतर होते. दालचिनी खाल्लेल्या पदार्थांमधून इंसुलिन आणि चयापचनास उत्तेजित करण्यास मदत करू शकते."

दालचिनीचा चहा तयार करण्याची योग्य पद्धत

साहित्य

१ लिटर पाणी, 

१ लहान दालचिनीची काडी किंवा ५ लहान चमचे दालचिनी पावडर, 

१/२ चमचा मध.

कृती

एका भांड्यात पाणी उकळून घ्या. दालचिनी पावडर टाकून मिश्रण मध्यम आचेवर पाच मिनिटासाठी राहू द्या.

हा चहा गार होऊ द्या नंतर यात मध मिसळा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळून घ्या. थोंड कोमट झाल्यानंतर तुम्ही या चहाचं सेवन करू शकता.

स्वयंपाकघरातील हा घटक तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट करून आणि तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. झोपण्याआधी दालचिनीचा चहा प्यायल्याने तुमच्या थकलेल्या स्नायूंना आराम मिळेल आणि फॅट्स कमी होण्यास मदत होईल. 

टॅग्स :आरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्न