रोज एवढा व्यायाम करतेय, डाएट चालू आहे. साखर बंद केली आहे...पण एवढं सगळं करूनही वजन काही कमी होत नाही.. असं वेटलॉससाठी प्रयत्न करणाऱ्या बऱ्याच जणांचं होतं... सगळं पथ्य पाळूनही वजन कमी (avoid these mistakes in weight loss) होत नसेल, तर ते खरोखरंच खूप त्रासदायक असतं.. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की पथ्य पाळूनही वजन कमी (Weight loss tips in Marathi) होताना दिसत नसेल तर मग अनेक जणं व्यायाम, डाएट (diet rules) हे सगळं वैतागून सोडून देतात आणि बिनधास्त रूटीन सुरू करतात. वजन कमी होत नाही, म्हणून तुम्हीही असंच काही करण्याच्या मार्गावर असाल तर थोडं थांबा आणि वजन कमी करण्यात नेमके काय अडथळे येत आहेत ते जाणून घ्या.
वजन कमी करण्याच्या प्रवासात बऱ्याचदा काय होतं की दिवसभर खाण्यापिण्याचं सगळं पथ्य अगदी व्यवस्थित पाळल्या जातं. पण रात्री मात्र स्वयंपाक करण्याचा आलेला कंटाळा, एखाद्याकडून आलेलं पार्टीचं निमंत्रण, घरी कुणी पाहुणे जेवायला येणार असल्यामुळे केलेला स्पेशल बेत यामुळे मग रात्रीच्या जेवणाचं पथ्य हुकतं आणि मग जे समोर आलं ते पोटात टाकलं जातं. इथेच तर सगळी गडबड होते. म्हणूनच तर वजन कमी करायचं असेल किंवा वजन वाढू द्यायचं नसेल तर या रात्रीच्या जेवणात (Do not eat these 6 food items in your dinner) या काही गोष्टी खाणं कटाक्षानं टाळा.
१. ब्रेड, पाव (bread)पावभाजी, मिसळपाव हा अनेक जणांचा आवडीचा मेन्यू... रात्रीच्या जेवणात बऱ्याचदा पावभाजी किंवा मिसळपावचा बेत अनेक घरांमध्ये आखला जातो. किंवा घरी न करता बाहेर जाऊनही पावभाजी, मिसळपाव यांच्यावर यथेच्छ ताव मारला जातो. पण खरंतर वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी या दोन गोष्टी रात्रीच्या जेवणात अजिबात घेऊ नयेत. त्यांचं पचन होण्यास खूप वेळ लागतो.
२. बटर, चीज, लोणी (butter and cheese)बटर, चीज किंवा घरी तयार केलेलं लोणी हे पदार्थ खरेतर पौष्टिक आहेत. पण म्हणून ते रात्री खाऊ नयेत. हे पदार्थ सकाळी नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात नक्कीच खा. पण रात्री ते खाणं टाळा. कारण त्यात खूप जास्त फॅट्स असतात. रात्रीच्या जेवणानंतर आपण तासादोन तासांत झोपतो. त्यामुळे मग फॅट बर्न न होता शरीरात तसेच साचून राहतात.
३. केक, पेस्ट्रिज (cake and pastries)वाढदिवस साजरे करणं किंवा कुठल्याही गोष्टीची सेलिब्रेशन पार्टी शक्यतो रात्रीच असते. आता असं सेलिब्रेशन म्हटलं की हमखास केक कटींग आलंच.. त्यामुळे मग रात्रीच्या वेळी केक खाणं होतो आणि वेटलॉसचा सगळाच फज्जा उडतो. केक, पेस्ट्री या पदार्थांमध्ये खूप जास्त बटर किंवा तेल आणि साखरेचा वापर करण्यात आलेला असतो. हे तिन्ही पदार्थ वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतले मोठे अडथळेच आहेत. त्यामुळे रात्री असं काही खाणं टाळा.
४. केळी आणि दूध (banana and milk)रात्रीच्या जेवणात शिकरण पोळी खाणार असाल, तर असं करू नका. कारण एक तर कोणतंही फळ आणि दूध हे विरूद्ध अन्न आहे. त्यामुळे ते खाऊ नये. शिवाय केळी रात्रीच्या जेवणात किंवा जेवणानंतर खाणं आरोग्यासाठी अजिबातच चांगलं नाही.
५. पिझ्झा आणि नूडल्स (pizza and noodles)पिझ्झा पार्टी, नूडल्स पार्टी ही देखील अनेकदा रात्रीच आयोजित केली जाते. एखाद्या पार्टीत तर हे दोन मेन्यू असल्याशिवाय अनेक जणांना पार्टीचा फिलच येत नाही. पण हे दोन्ही पदार्थ तुमचं वजन वाढण्यासाठी खूप मदत करत आहेत, ही गोष्ट सगळ्यात आधी लक्षात घ्या. पिझ्झा आणि नूडल्स पचायला खूपच जड असल्याने त्या रात्रीच्या वेळी खाणं टाळा.
६. चहा किंवा कॉफी (tea and coffee)रात्री जेवण झालं की गप्पा मारत मारत किंवा टिव्ही, मोबाईल बघत बघत चहा, कॉफी पिण्याचा नाद अनेक जणांना असतो. पण असं करणं आरोग्यासाठी अजिबातच चांगलं नाही. जेवणानंतर चहा, कॉफी घेतल्यास पचनाचा वेग मंदावतो आणि मग खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. पचन न झाल्यास शरीरावर चरबीचे थर साचण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी नकोच.