Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं

Weight Loss Tips : जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने डायजेशन चांगले होते याशिवाय मेटाबॉलिझ्म सुद्धा वाढतो यात काहीही शंका नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 11:58 AM2023-11-24T11:58:58+5:302023-11-24T12:23:40+5:30

Weight Loss Tips : जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने डायजेशन चांगले होते याशिवाय मेटाबॉलिझ्म सुद्धा वाढतो यात काहीही शंका नाही.

Weight Loss Tips : Does Drinking Hot Water After Meals Helps in Weight loss | गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं

गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन घटतं? तज्ज्ञ सांगतात पोटभर खाऊन वेट कंट्रोलमध्ये कसं ठेवायचं

तुम्ही पाहिले असेल की बरेचसे लोक जेवणानंतर गरम पाणी पितात. (Weight L0ss tips) आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न असतात. काहीजण काहीही खाल्ल्यानंतर गरम पाणी घोटून पितात. यामुळे अन्न पचवण्यास मदत होते पण खूप कमी लोक जेवणानंतर गरम पाणी पितात. (Does Drinking Water After Meals Helps in Weight loss)

गरम पाणी प्यायल्यानं खरंच वजन कमी करण्यास मदत होते का, असा प्रश्न अनेकांना उद्भवतो. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल आणि गरम पाणी प्यायल्यानंतरही वजन कमी होत नसेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन स्वत:ला मेंटेन ठेवू शकता. (Does drinking water after eating help weight loss)

जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते का? (Can You Lose Weight by Drinking Hot Water)

प्रसिद्ध आहारातज्ज्ञ अंजली मुखर्जी यांच्यामते जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने डायजेशन चांगले होते याशिवाय मेटाबॉलिझ्म सुद्धा वाढतो यात काहीही शंका नाही. (Weight Loss Tips in Marathi) म्हणूनच जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी गरम पाणी प्यायला हवं. जेवल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने वजन कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होईल. पण एकाच पद्धतीचे डाएट रुटीन सर्वांना सूट होत नाही हे सुद्धा लक्षात घ्यायला हवं. काही सोपे घरगुती उपाय तुम्हाला वजन कमी करण्यात मदत करू शकतात यामुळे वजन वाढण्याची समस्या उद्भवत नाही.

जेवणानंतर गरम पाणी पिऊनही काही लोकांचे वजन का कमी होत नाही? (Will drinking warm water after meals help in weight loss)

वजन कमी करण्यासाठी सगळ्यात आधी दैनंदिन कॅलरीच्या सेवनाचा रेकॉर्ड ठेवावा.  दैनिक कॅलरीच्या सेवनानपेक्षा २०० ते २५० कॅलरीजचे कमी प्रमाणा सेवन करावे. जर तुम्ही रोजच्या कॅलरी इन्टेकपेक्षा जास्त खात असाल तर जेवल्यानंतर गरम पाणी पिऊनही अजिबात वजन कमी होणार नाही.

थंडीत खायलाच हवी मुळ्याची चटपटीत चटणी, महिनाभर टिकणाऱ्या मुळ्याच्या चटणीची सोपी रेसिपी 

अनेकजण फक्त डाएटने कॅलरीज कमी करू शकत नाहीत. अशात व्यायाम करण्याची सवय ठेवा. ८ ते १० पाऊल पायी चाला. अतिरिक्त कॅलरीज शरीरात चरबी तयार करतात. म्हणून वजन कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाणी पित असाल तर इतर गोष्टींकडेही लक्ष द्या.

Web Title: Weight Loss Tips : Does Drinking Hot Water After Meals Helps in Weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.