बेली फॅट (Belly Fat) म्हणजे पोटाच्या अवतीभवती जमा झालेली अतिरिक्त चरबी लवकर कमी होण्याचं नावच घेत नाही. लोक ही चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात (Weight Loss Tips). काही खास उपाय करून तुम्ही बेली फॅट कमी करू शकता. बेली फॅट कमी करण्यचा नैसर्गिक उपाय समजून घ्यायला हवा. बेली फॅट कमी करण्यासाठी रोज एका ड्रिंकचं सेवन करा. हे ड्रिंक तुम्ही घरीच स्वत: तयार करू शकता. या ड्रिंकबाबत हेल्थ एक्सपर्ट्स रामिता कौर यांनी इंस्टाग्रामवर अधिक माहिती दिली आहे. (Easy Ways To Lose Weight Naturally)
साहित्य
१) हळद - १ चतुर्थांश
२) लवंग - १ ते २
३) किसलेलं आलं -१ इंच
४) दालचिनी- एक चुटकी
५) लिंबाचा रस- अर्धा चमचा
६) काळी मिरी पावडर - १ चुटकी
७) पाणी - १ ग्लास
एका पॅनमध्ये पाणी घाला, नंतर यात साहित्य घाला. व्यवस्थित उकळल्यानंतर जेव्हा रंग बदलले तेव्हा गॅस बंद करा. नंतर ग्लासमध्ये गाळून घ्या. यात लिंबाचा रस मिसळून प्या. हळदीत करक्यूमिनसारखे तत्व असतात. ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते, फॅन बर्न होण्यास मदत होते. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म चांगला राहतो. आल्यात एंटी ऑक्सिडेंटसयुक्त गुण असतात जे सूज कमी होण्यास मदत होते.
केस फारच गळतात? जास्वंदात हा पदार्थ मिसळून हेअर मास्क लावा; दाट, लांबसडक होतील केस
दालचिनीमुळे मेटाबॉलिझ्म वाढतो, दालचिनीमुळे फॅट बर्निंग प्रक्रिया चांगली होते, लिंबात व्हिटामीन सी आणि एंटीऑक्सिडेंट्स भरपूर असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारता येते. टॉक्सिन्स शरीरातून बाहेर पडतात, काळ्या मिरीत पाईपराईन असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.