Join us  

पोट सुटलंय, खाणं कमी केलं तरी वजन घटत नाही? 4 चुका टाळा, लवकर स्लिम-फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2023 12:13 PM

Weight Loss Tips : जिम आणि डाएट करूनही जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा तुम्हाला पूर्ण जीवनशैली बदलावी लागू शकते.

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा स्नायूंचा विकास करायचा असेल तर रोजच्या आहारात काही चुका टाळायला हव्यात. अन्यथा कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होण्यात अडथळे येऊ शकतात. (Weight Loss Tips) व्यायाम आणि डाएटचाही काही परिणाम होत नाही. (Four Biggest Weight Loss Mistakes You Should Avoid)

जिम आणि डाएट करूनही जेव्हा वजन कमी होत नाही तेव्हा तुम्हाला पूर्ण जीवनशैली बदलावी लागू शकते. सर्टिफाईड फिटनेस कोच सांगतात की, बॉडी ट्रांसफॉर्मसाठी योग्य गायडंस आणि ट्रेनिंग घ्यायला हवी. यासोबतच  ४ गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे. तरच तुम्हाला चांगला रिजल्ट दिसून येईल. वेट लॉस  किंवा वेट गेन करताना कोणत्या चुका टाळाव्यात ते पाहूया. (Things you can do to lose weight)

कॅलरीज काऊंट, काय खाता याची नोंद

वजन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी डाएट फार महत्वाचं असतं. तुम्ही रोज किती खाता आणि काय खाता याचा रेकॉर्ड मेंटेन ठेवा म्हणजेच फूड इन्टेक काऊंट करायला हवं.  तुम्ही एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊन माहिती करून घेऊ शकता की तुमच्या शरीराला प्रोटीन्स, कार्ब्स, फायबर्स, फॅटची किती आवश्यकता आहे. यामुळे शरीराला गरजेपेक्षा कमी किंवा जास्त न्युट्रिशन मिळण्याचा धोका नसतो.

कार्डिओ व्यायाम

फिट राहण्यासाठी फक्त जिम किंवा वर्कआऊट पुरेसं नसतं. संपूर्ण दिवस तुम्ही फिजिकल एक्टिव्हीटीजमध्ये सहभाग घ्यायला हवा. यामुळे जास्तीत जास्त कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल. तुम्ही पायी चालणं, शिड्या चढणं, सायकल चालवणं, चालायला जाणं असे वेगवेगळे व्यायाम करू शकता.

पुरेसा आराम

रिकव्हर होण्यासाठी मसल्सना आरामाची गरज असते. जी झोपेदरम्यान मिळेत. प्रत्येक व्यक्तीची झोपेची गरज वेगवेगळी असू शकते.  याबाबत तुम्ही एक्सपर्ट्सचा सल्ला घेऊ शकता. व्यक्तीला जवळपास ७ ते ८ तास झोप पुरेशी असते.

शरीर हायड्रेट असायला हवं

बॉडी ट्रांसफॉर्मसाठी हायड्रेशन फार गरजेचं असतं. लोक ज्यूस, ड्रिंक, साखरयुक्त पेय जास्तीत जास्त पितात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाण्याची जास्त  गरज असते. म्हणूनच रोज पुरेश्या प्रमाणात पाणी प्यायला हवं. जर तुम्ही पाणी कमी पीत असाल तर वजन कमी करणं कठीण होऊ शकतं. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स