Join us  

पोट आणि साईड फॅट खूपच वाढलंय? सकाळी उठल्यानंतर १ काम करा, १५ दिवसांत घटेल चरबी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 1:59 PM

Weight Loss Tips (Pot kase kami karayche) : पोटाची चरबी कमी  करण्यासाठी जास्त काही न करता एक मॉर्निंग रूटीन सेट करायला हवं.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. (Fitness Tips) आजकाल लोक वाढलेल्या पोटाच्या चरबीने त्रस्त असतात. पोट बाहेर आल्याने फक्त पर्सनॅलिटी खराब दिसत नाही तर अनेक गंभीर आजारही उद्भवू शकता. आपण फिट राहावं, मेंटेन बॉडी दिसावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. (How to Use Jeera For Weight Loss)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. पोटाची चरबी कमी  करण्यासाठी जास्त काही न करता एक मॉर्निंग रूटीन सेट करायला हवं. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी कोणता आयुर्वेदीक उपाय करता येईल पाहूया जेणेकेरून तुमचे शरीर मेंटेन राहण्यास मदत होईल. (Pot kami karnyache upay in marathi)

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदीक मॉर्निंग टी

१) १ चमचा  जीरं

२) ७ ते ८ कढीपत्त्याची पानं 

३) १ चमचा ओवा

४) १ इंच किसलेलं आंल

५) २ ग्लास पाणी

६) १ मोठा चमचा धण्याच्या बीया

वजन कमी करण्यासाठी जीरं आणि आल्याचा चहा

जिऱ्यात आणि आल्यात असे काही गुणधर्म असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. या बियांमध्ये एंटी इंफ्लेमेटरी  गुणधर्म असतात जीरं सूज, एसिडिटी,  अपचनाच्या समस्या दूर करण्यास मदत करते.  जीरं वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान बनवते. आलं जवळपास प्रत्येक भारतीय स्वंयपाकघरात  वापरलं जातं. यामुळे पचनाशी संबंधित समस्या कमी होतात. मेटाबॉलिझ्म नियंत्रणात राहतो. वजन कमी करण्यास मदत होते. आल्याचा आहारात समावेश  केल्यास मेटाबॉलिझ्म वेगानं वाढतो.

पोट कमी करायचं-व्यायामासाठी वेळ नाही? ५ मिनिटं भिंतीला पाय लावा-झरझर घटेल चरबी

1) जिऱ्याच्या सेवनाने पचनक्रियाही चांगली राहेत. गॅस झाल्यास जीरं चावून खा.  वजन कमी करण्यासाठी जीरं गरम पाण्यात मिसळून याचे सेवन करा. जीरं वजन कमी करण्यास साहाय्यक ठरते. 

2) जीरं पाण्यात भिजवल्यानंतर ते फुलते. यातील पोषक तत्व पाण्यात मिसळतात हलक्या पिवळ्या रंगात बदलतात. वजन कमी करण्यासाठी साध्या पाण्याऐवजी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करा.

नारळाच्या शेंड्या टाकून देता? ५ भन्नाट फायदे, पिकलेले केसही होतील काळेभोर-पूर्ण पैसे वसूल

3) जीऱ्यातील थायमोल नावाचे एंजाईम पचन रसाचा स्त्राव सुधारतात. यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवत नाही. यामुळे पचनक्रिया चांगली राहते पोट फुगत नाही. वजन कमी करण्यासाठी जीरं एक प्रभावी उपाय आहे.

4) वजन कमी करण्यासठी हायड्रेट राहणं फार महत्वाचे असते. अशावेळी शरीरातील हानीकारक टॉक्सिन्स  बाहेर पडण्यास मदत होते आणि हेल्दी वेट मेंटेन राहते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स