बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव, थोड्याशा अंतरासाठीही दुचाकीचा होणारा वापर, जंकफूडचं अतिसेवन अशा अनेक गोष्टींमुळे सध्या लठ्ठपणाची किंवा वजन वाढीची समस्या अनेकांना जाणवत आहे. आता वजन वाढू नये म्हणून व्यायामाऐवजी बहुतांश भर डाएटवर दिला जातो (Weight Loss Tips). अर्थात आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टी करणारे खूप जण आहेत. पण बऱ्याचदा डाएट करणे, कमी प्रमाणात खाणे असे काही उपाय वेटलॉस करणारे नेहमीच करतात. असं करताना अनेक जण उपाशी राहण्यासाठी मग नेमकं ब्रेकफास्ट किंवा नाश्ता करणं टाळतात (one simple thing for weightloss). पण नाश्ता टाळल्याने वजन कमी होणार तर नाही, उलट वाढण्याचीच शक्यता अधिक आहे, असं सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी नाश्ता टाळण्याचे ३ दुष्परिणाम सांगितले आहेत. (How to do weight loss within few days?)
नाश्ता न करण्याचे दुष्परिणाम
१. वजन कमी होत नाही
आपण दिवसभर काही ना काही कामं करत असतो. त्यामुळे दिवसभर शरीराला भरपूर कॅलरीज लागत असतात. पण जे लोक वेटलॉस करायचा म्हणून नाश्ता करणं टाळतात, त्यांना दिवसभरात योग्य प्रमाणात कॅलरी मिळत नाहीत.
लेक आजारी होती म्हणून..! सुश्मिता सेन सांगतेय, करिअर की मुलं आईला ठरवावंच लागतं कारण..
मग नंतर भूक लागल्याने ते जे मिळेल ते खातात आणि मग गरजेपेक्षा जास्त कॅलरी घेतल्या जातात. त्यामुळे मग वेटलॉस होत नाही. त्यामुळे अशी चूक टाळा आणि पोटभर नाश्ता करून नंतर कमी कॅलरी घ्या. यामुळे वेटलॉससाठी फायदा होईल.
२. फूड क्रेव्हींग वाढते
सकाळी व्यवस्थित न खाल्ल्यामुळे मग भूक भागत नाही. सारखं सारखं काहीतरी खावंसं वाटतं.
हवा बदलली की लगेच सर्दी- कफाचा त्रास होतो? १ सोपा उपाय, नाक होईल मोकळं- कफ कमी
भुकेच्या नादात मग जे काही समोर येतं ते खाल्लं जातं. अशावेळी मग कॅलरीचा विचार फार काही केला जात नाही. त्यामुळे मग अर्थातच वजन वाढीवर त्याचा परिणाम होतो.
३. चिडचिड होते
पोटात काही गेले नाही तर मग शरीरातील हार्मोन्सची पातळी कमी जास्त होते. त्याचा परिणाम चिडचिड करण्यावर होतो. त्यामुळे चिडचिड होऊ द्यायची नसेल, डोकं आणि मन शांत ठेवायचं असेल, तर नाश्ता करणं विसरू नका.