Join us  

सारखं काहीतरी खावंसं वाटतं आणि वजन वाढतं? ३ उपाय, वजन उतरेल झर्रकन, खा-खा होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 12:52 PM

3 Important Tips To Avoid Over Eating :वजन कमी होण्याच्या प्रक्रियेतला मुख्य अडसर ठरतो ती आपली सतत काहीतरी तोंडात टाकण्याची सवय... अशी सारखी खा- खा होत असेल तर हे काही उपाय करून पाहा.. (weight loss tips)

ठळक मुद्देसारखी भूक लागते आणि त्यापायी मग जरा जास्तच खाल्लं जातं. अशा पद्धतीचं ओव्हरइटिंग टाळण्यासाठी बघा काय करावं...

वजन कमी करण्याचा बरेच जण आटोकाट प्रयत्न करतात. त्यासाठी अगदी नियमितपणे व्यायाम करतात, डाएट करतात. पण असं सगळं करून वजन मात्र कमी होत नाही. ते जशास तसंच असतं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सतत काहीतरी खाण्याची, येता- जाता तोंडात काहीतरी टाकण्याची सवय. बऱ्याच लोकांचं वजन कमी न हाेण्याचं मुख्य कारण हेच असतं (weight loss tips). सतत काहीतरी खावं वाटतंय याचा अर्थ तुमचं डाएटिंग चुकीच्या पद्धतीने चालू आहे. तुमचं पोट भरत नाहीये. तुमच्या शरीरात काही मुलभूत घटकांची कमतरता निर्माण होते आहे, त्यामुळे सारखी भूक लागते आणि त्यापायी मग जरा जास्तच खाल्लं जातं. अशा पद्धतीचं ओव्हरइटिंग टाळण्यासाठी बघा काय करावं... (3 important tips to avoid over eating and food craving )

ओव्हरइटिंग टाळण्यासाठी उपाय

 

१. नाश्ता टाळू नका

वजन कमी करण्याच्या नादात अनेक जण नाश्ता टाळतात आणि थेट दुपारीच जेवतात. असं करू नका. कारण रात्रभराचा उपवास झाल्यानंतर तुमच्या शरीराला उर्जेची गरज असते.

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, दिवस होईल यादगार...

ती नाश्त्यातून मिळते. त्यामुळे पोटभर नाश्ता करा. त्यामध्ये अधिकाधिक प्रोटिनयुक्त हेल्दी पदार्थ घ्या. यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत होणारं क्रेव्हिंग आपोआप कमी होईल. 

 

२. फायबरयुक्त जेवण

नाश्त्यामध्ये प्रोटीन्स योग्य प्रमाणात घेतल्यानंतर दुपारच्या जेवणात फायबर अधिक प्रमाणात घेण्याचा प्रयत्न करा. फायबर अधिक प्रमाणात असल्याने पोट अधिककाळ भरल्यासारखं वाटतं.

केमिकल्स असणारं विकतचं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा भरपूर प्रोटीन्स देणारं मेयोनिज

त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. प्राेटीन आणि फायबर या दोन्ही गोष्टी ओव्हरइटिंग टाळण्यास बऱ्याच प्रमाणात मदत करतात अशी डॉ. पलानीयाम्मा धुराईराज यांनी दिलेली माहिती टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केली आहे.

 

३. पाणी प्या

वरीलप्रमाणे नाश्ता, जेवण करूनही सारखी भूक लागत असेल तर अशावेळी काहीतरी खाण्यापेक्षा ग्लासभर पाणी प्या. नुसतं पाणी जात नसेल तर त्यात चिया सीड्स टाकून प्या.

गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- बघा इंस्टंट रेसिपी

पाण्याऐवजी साखर, मीठ असं काहीही न घालता केलेलं ताक, लिंबू पाणी असंही घेऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होईल आणि अतिरिक्त पदार्थही पोटात जाणार नाहीत. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नआहार योजना