चयापचय क्रिया, पचनक्रिया व्यवस्थित पार पडल्या नाही किंवा त्यांच्यावर रोजच अतिरिक्त ताण येत असेल तर शरीरावर चरबी साचण्याचे प्रमाण वाढत जाते. शरीरावर एक प्रकारची सूज येते. यालाच Inflammation असंही म्हणतात. जेव्हा आपण व्यायामाला किंवा डाएटिंगला सुरुवात करतो, तेव्हा सगळ्यात आधी शरीरावरची सूज ओसरते आणि वजन काही प्रमाणात कमी होतं (weight loss tips). त्यालाच आपण इंचेस लॉस असंही म्हणताे. शरीरावर अशा पद्धतीने आलेला फुगीरपणा किंवा शरीरावरची सूज कमी करायची असेल तर त्यासाठी काही पदार्थ आहारातून आपल्या पोटात नियमितपणे जाणं गरजेचं आहे (how to reduce body Inflammation And Cut Belly Fat?). कारण त्यामुळे पचनक्रिया आणि चयापचय क्रिया व्यवस्थित होतात. त्यासाठी नेमकं काय करायचं, याविषयी ही खास माहिती...(best home remedy to reduce belly fat)
अंगावरची सूज, पोटावरची चरबी कमी करण्याचा उपाय
अंगावरची चरबी कमी करण्यासाठी कोणता उपाय करावा, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ नेहा परिहार यांनी साेशल मिडियावर शेअर केली आहे.
जुना झाडू फेकू नका, बागेच्या सजावटीसाठी वापरा- बघा बागेचा लूक बदलणाऱ्या ३ सुंदर आयडिया
त्या सांगतात की अयोग्य आहार, ताण, झोपेची कमतरता यामुळे कोर्टीसोल हार्मोन्सची पातळी वाढते. त्यामुळे मग शरीरावर सूज येणे, पाेट, कंबर सुटणे असे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी तर आपल्या आहारात थोडे बदल करणं गरजेचं आहे. यासाठी कच्चा आवळा, हिरव्या पालेभाज्या, ओली हळद, मीरेपूड, ऑलिव्ह ऑईल, सुकामेवा असे पदार्थ नियमितपणे खावे. तसेच प्रोसेस्ड फूड, साखर, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स घेणं टाळावं.
त्याचबरोबर त्यांनी दररोज सकाळी एक खास सरबत पिण्याचा सल्लाही दिला आहे. सरबत तयार करण्यासाठी ओली हळद, आलं, मोसंबी, आवळा आणि मीरेपूड हे साहित्य लागणार आहे.
महागडी आवळा पावडर- चूर्ण कशाला विकत घेता? २० रुपयाचे आवळे आणून 'या' पद्धतीने घरीच करा
त्यासाठी सगळ्यात आधी तर आलं आणि हळद स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांची सालं काढून टाका. यानंतर त्यांचे बारीक तुकडे करा आणि ते मिक्सरमध्ये टाका. त्यातच आवळा आणि मोसंबीचे तुकडेही टाकावे.
थोडंसं पाणी घालून सगळे पदार्थ मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत आणि त्यानंतर ते गाळून घ्यावे.
आता तयार झालेला जो रस आहे तो एका कपामध्ये काढा. त्यात थोडी मिरेपूड आणि हवं असल्याचं काळं मीठ टाका. सगळं व्यवस्थित हलवून घ्या आणि दररोज सकाळी हे सरबत नियमितपणे प्या.