Join us  

Weight Loss Tips: पोटावरची चरबी कमी करायची तर बंद करा 5 गोष्टी खाणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2022 4:08 PM

Weight Loss Tips: आहार हा आपल्या आरोग्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आहारातून काही गोष्टी ठरवून बंद करायला हव्यात या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...

ठळक मुद्देतुमच्या शरीराचा आकार बेढब होऊ शकतो. त्यामुळे आईस्क्रीम टाळलेले केव्हाही चांगले. मैद्यामुळे शरीराला काहीही मिळत नसून त्यामुळे केवळ चरबी वाढते. म्हणून मैदा खाणे आरोग्यासाठी घातक आहे

पोटावरची चरबी एकदा वाढायला लागली की ती लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. सुरुवातीला आपण या गोष्टकडे दुर्लक्ष केले तरी हळूहळू पोटाचा घेर वाढत जातो आणि आपण बेढब दिसायला लागतो. मग मित्रमंडळींमध्येही आपण चेष्टेचा विषय होतो. इतकेच नाही तर वाढलेल्या पोटामुळे आपल्या बऱ्याच हालचालींवर मर्यादा येतात. इतकेच नाही तर एकदा शरीरावर चरबी जमा व्हायला सुरुवात झाली की हळूहळू आपण लठ्ठ होतो आणि मग लठ्ठपणामुळे आरोग्याच्या इतरही तक्रारी डोकं वर काढायला लागतात. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव आणि सततची बैठी जीवनशैली यामुळे पोटाचा घेर वाढत असेल तर त्यावर वेळीच उपाय करायला हवेत (Weight Loss Tips) . नाहीतर भविष्यात येणाऱ्या अडचणी आपण टाळू शकत नाही. आहार हा आपल्या आरोग्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असून पोटावरची चरबी कमी करायची असेल तर आहारातून काही गोष्टी ठरवून बंद करायला (Diet Tips) हव्यात या गोष्टी कोणत्या ते पाहूयात...

(Image : Google)

१. ज्यूस न पिता फळं खा...

उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा एरवीही अनेकदा आपण फळं कापून खाण्याऐवजी फळांचे ज्यूस पितो. पण ज्यूस पिणं आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. याचं कारण म्हणजे ज्यूसमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे सॉफ्ट ड्रींक किंवा पॅकींग केलेले ज्यूस पिणे लठ्ठपणा वाढण्यासाठी महत्त्वाचे कारण ठरू शकते. ज्यूस करताना फळांतील फायबरयुक्त पदार्थ किंवा फळांची साले काढली जातात. यामुळे फळांचे पोषण कमी होते. त्यामुळे फळांच्या ज्यूसपेक्षा फळे कापून खाल्लेली केव्हाही जास्त चांगली. 

२. व्हाईट सॉस पास्ता

पास्ता हा मूळात मैद्यापासून तयार झालेला असतो. तसेच व्हाईट सॉस तयार करण्यासाठीही मैदा वापरला जातो. मैदा पचण्यासाठी जड असून त्यासाठी शरीराची जास्त प्रमाणात उर्जा खर्च होते. तसेच मैद्यात फायबर कमी असल्याने नुसते पोट भरते पण शरीराचे विशेष पोषण होत नाही. व्हाईट सॉस पास्तामुळे आपल्या पोटाचा घेर काही दिवसांतच वाढायला लागतो. त्यामुळे पोटावरची चरबी कमी करायची असेल तर हा पास्ता न खाल्लेलाच केव्हाही चांगला. 

३. शुगर फ्री फूडस

हल्ली बाजारात लहान मुलांसाठी किंवा शुगर असणाऱ्यांसाठी शुगर फ्री पदार्थ मिळतात. या पदार्थांना शुगर फ्री म्हटलेले असले तरी हे शुगर फ्री फूडस पचायला जड असतात. यामुळे पचनाच्या तक्रारी, डायरीया,  गॅसेस यांसारख्या तक्रारी उद्भवू शकतात. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटे, केक, कँडीज, सॉफ्ट ड्रींक यांचा समावेश असतो. साखर पोटात जायला नको म्हणून आपण ते खातो पण या पदार्थांमुळे फायदा होण्याऐवजी अपाय होतो. 

(Image : Google)

४. मैद्याचे पदार्थ 

आपल्याला पोटावरील किंवा शरीरावरील चरबी घटवायची असेल तर मैदा असलेले पदार्थ खाणे थांबवायला हवे. यामध्ये बर्गर, मॅगी, नूडल्स, बिस्कीटे, ब्रेडचे पदार्थ यांसारख्या गोष्टी खाणे आवर्जून टाळायला हवे. मैद्यामुळे शरीराला काहीही मिळत नसून त्यामुळे केवळ चरबी वाढते. म्हणून मैदा खाणे आरोग्यासाठी घातक आहे. फास्टफूड हे बहुतांश वेळा मैद्याचे बनवलेले असल्याने ते आरोग्यासाठी घातक असते. 

५. आईस्क्रीम 

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे आईस्क्रीम. उन्हाळ्याच्या दिवसांत तर अनेकांकडे दररोज खाल्ला जाणारा हा पदार्थ जीभेला चांगला लागत असला तरी आरोग्यासाठी तो घातक आहे. विशेषत: तुम्हाला वाढलेली चरबी कमी करायची असेल तर आईस्क्रीम खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामध्ये असणारी साखर आणि क्रिम यांचे प्रमाण चरबी वाढण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळे तुमच्या शरीराचा आकार बेढब होऊ शकतो. त्यामुळे आईस्क्रीम टाळलेले केव्हाही चांगले. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स