Join us  

कोण म्हणतं रात्रीचं जेवण सोडल्यानं वजन पटापट कमी होतं; लवकर फिट होण्यासाठी डॉक्टर सांगतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 4:23 PM

Weight Loss Tips In Marathi (Ratri Jevan nahi kel tr Vajan Kami hote ka) : बहुतेक लोक सकाळी कामामुळे व्यवस्थित जेवत नाहीत आणि रात्री कुटुंबियांबरोबर असताना आनंदाने पोटभर जेवतात.

रात्री लवकर जेवलं किंवा रात्रीचं जेवण सोडलं की वजन कमी होतं असा अनेकांचा समज आहे. पण अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात आणि जेवणाच्या वेळा नियमित ठेवत नाहीत. (How to lose Weight Faster) रात्रीचं जेवण कसं आणि किती वाजता करावं याबाबत आयुर्वेदीक डॉक्टर वी.के पांडे यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. (Health Does Skipping Dinner at Night Help in Weight Lose)

अनेकांना वाटतं की रात्रीचे जेवण कमी केले किंवा रात्री जेवलेच नाही तर वजन कमी होतं. काही जणांना रात्रीचे जेवण वेळेवर न केल्यास कमकुवतपणा आणि थकवा येतो. हे दोन्ही समज चुकीचे आहे. खरंतर रात्रीचे जेवण करण्याची योग्य वेळ माहीत असायला हवी. ज्यामुळे वजनही वाढणार नाही आणि शरीर कमकुवतही होणार नाही. (Does skipping dinner help in losing weight)

एव्हरी डे हेल्थ.कॉमच्या  अहवालानुसार रात्रीचे जेवण फक्त तिसरे मील नसून तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी शरीरात उत्पन्न होणाऱ्या कॅलरीज आणि पोषणासाठी हे आवश्यक आहे. बहुतेक लोक सकाळी कामामुळे व्यवस्थित जेवत नाहीत आणि रात्री कुटुंबियांबरोबर असताना आनंदाने पोटभर जेवतात. यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यही चांगले राहते. 

रात्रीच्या जेवणाची योग्यवेळ कोणती? (When is the good time to eat dinner)

रात्रीच्या जेवणाची वेळ संध्याकाळी ७ ची असावी.  झोपण्याच्या कमीत कमी ३ ते ४ तास आधी रात्रीचे जेवण करावे.   तर तुम्ही रात्री  १० वाजता झोपत असाल तर  ६ वाजता जेवायची सवय ठेवा तर तुम्ही ११ वाजता झोपत असाल तर ७ ला जेवा. अस केल्याने झोपण्याच्या वेळेस तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन झालेले असेल आणि सकाळी तुम्हाला कमकुवतपणा जाणवणार नाही. (थोडं काम केलं की लगेच थकवा येतो? व्हिटामीन-12 देणारे ८ पदार्थ रोज खा, भरपूर ताकद येईल)

झोपण्याआधी डिनर करू  नका (The Best Time to Eat Dinner)

रात्री झोपण्याच्या फार आधी डिनर करू नका. असं केल्याने वजन वेगाने वाढेल आणि सकाळी तुम्हाला आळस येईल. शरीर सुस्त राहील. रात्री उशीरा जेवल्याने मेटाबॉलिझ्म स्लो होतो. ज्यामुळे अन्न पचायला त्रास होतो आणि गॅस, एसिडिटीचा त्रास होऊ शकतो. (ऐन तरूण्यात गुडघे-कंबर दुखतेय? हाडांना भरपूर कॅल्शियम देईल 'हा' सोपा उपाय, १५ दिवसांत अशक्तपणा दूर)

डायबिटीस पेशंट्सनी अधिक काळजी घ्यावी (Best time to eat dinner for diabetics).

डायबिटीज  पेशंट्सनी रात्रीचे जेवण सोडू नये. कारण  यामुळे त्यांची शुगर लेव्हल कमी होऊ शकते. जे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरते. शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्रीच्या  जेवणात हलका आहार घेऊ शकतात. रात्री ९  वाजता  गोळ्या घेताना  सूप घेऊ शकतात.  जर तुम्ही योग्य टाईम टेबल फॉलो केले म्हणजेच झोपण्याच्या  ४ तास आधी डिनर केला तर काही दिवसांतच तुमचं वजन कमी झालेलं दिसेल आणि हलकं वाटले.  सकाळीही थकवा जाणवणार नाही. 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स