प्रेग्नंसी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यात एक सुंदर क्षण असतो. ज्यामुळे महिलेचं पूर्ण आयुष्यचं बदलून जातं. डिलिव्हरीनंतर महिलांना अनेक प्रकारच्या शारीरिक मानसिक त्रासातून जावं लागतं त्यातीलच एक म्हणजे वजन वाढणं. (Weight Loss Tips) वाढलेल्या वजनामुळे अनेकांचाा आत्मविश्वास कमी होतो. शरीर योग्य आकारात आणण्यासाठी महिला अनेक पदार्थ खाणं सोडतात. ज्यामुळे मुलांना दूध अंगावरच दूध व्यवस्थित मिळत नाही आणि थकवा जाणवतो. (Pumpkin and drumstick soup for weight loss)
आई बनल्यानंतर तुम्ही सुद्धा भरपूर वजन वाढवलं असेल तर एक्सपर्ट्सनी सुचवलेल्या काही हेल्दी टिप्स तुमचं काम सोपं करू शकतात. डायटिशिय रिचा डोशी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी एक खास सूपची रेसिपी शेअरर केली आहे. यामुळे वजन कमी करणं सोपं होऊ शकतं.
वजन कमी करण्यासाठी हेल्दी व्हेजिटेबल सूप कसं बनवायचे?
१) सगळ्यात आधी कुकरमध्ये २ कप पाणी घालून चिरलेला टोमटो, गाजर, कॉर्न, पालक, शिमला मिरची घाला. तुम्ही यात तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. त्यानंतर ४ ते ५ शिट्ट्या होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्या.
२) प्रेशर कुकरमधील हवा पूर्ण निघाल्यानंतर भाज्या ब्लेंडरमध्ये व्यवस्थित वाटून घ्या. ब्लेंड केलेल्या भाज्या त्यातील पाणी काढून गाळून घ्या.
३) आता गॅसवर एक पॅन ठेवा त्यात १ टेबलस्पून तूप, अर्धा चमचा राईचे दाणे, जीरं आणि हिंग घालून फोडणी द्या. त्यात सर्व प्रकारच्या भाज्यांची पेस्ट घाला आणी आवश्यकतेनसुार पाणी घाला.
४) या मिश्रणात १/४ चमचे हळद, काळी मिरी पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालून काही मिनिटं उकळू द्या. तयार आहे भाज्यांचे गरमागरम हेल्दी सूप.
१०० वर्षे ठणठणीत जगण्याचं सिक्रेट, संशोधन सांगते शंभरी गाठणारी माणसं नक्की खातात काय..
या भाज्यांमध्ये प्रोटीन, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, फायबर आणि जिंक असते. फायबर्समुळे दीर्घकाळ तुमचं पोट भरलेलं राहतं. आणि तुम्ही जास्त खात नाहीत. यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. यातील पोषक तत्व शरीराला आतून बळकट बनवतात. यात फायबर्सचे प्रमाण अधिक असते.