बॉलीवूडची फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीचा फिटनेस तर आपण जाणतोच. शिल्पा सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दर सोमवारी एक फिटनेस मंत्र देत असते. कधी ती योगासने करून दाखवते तर कधी एखाद्या वर्कआऊटचा व्हिडियो शेअर करून त्याबाबत सविस्तर माहिती देत असते. शिल्पाने या आठवड्याची फिटनेस टिप नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये ना तिने कोणत्या योगासनाची माहिती दिली आहे, ना तिने कोणते वर्कआऊट सांगितले आहे. या आठवड्यात शिल्पाने तिच्या चाहत्यांना एक सुपर हेल्दी पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. हा पदार्थ म्हणजे दुधी भोपळा. हिंदीमध्ये आपण त्याला लोकी म्हणतो तर इंग्रजीमध्ये तो bottle gourd म्हणून ओळखला जातो.
शिल्पा शेट्टीसारखं स्लिमट्रीम व्हायचं असेल, तर दुधी भोपळा नियमितपणे खाल्लाच पाहिजे. केवळ वजन कमी करायचं म्हणून नाही, तर आरोग्याला इतरही अनेक फायदे व्हावेत, म्हणून नियमितपणे दुधी भोपळा खा. दुधी भोपळ्यामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, प्रोटीन्स, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे दुधी भोपळा नियमितपणे पोटात जाणं खूप गरजेचं आहे. भाजी आवडत नसेल तर पराठा, सूप करून दुधी भोपळा खा, पण खा जरूर असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात.
बहुगुणी दुधी भोपळ्याचे हे आहेत फायदे....- झटपट वजन कमी करण्याचा सोपा उपायदुधी भोपळ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात. तसेच त्याच्यातील कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर आहारात दररोज दुधी भोपळा घ्या. झटपट वजन कमी करायचे असल्यास दररोज रात्री दुधी भोपळ्याचे सूप न विसरता प्या. यामुळे वजनही कमी होते आणि तब्येतीवरही कोणता परिणाम होत नाही, असं फिटनेस तज्ज्ञांचं मत आहे.
- हृदयरोग राहतो नियंत्रणातहृदयविकाराचे प्रमाण खूप वाढत चालले आहे. यामुळे तरूण वयात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमेार आहेत. हृदयविकारापासून दूर रहायचे असल्यास किंवा हृदयरोगाचा संभाव्य धोका कमी करायचा असल्यास आहारात नियमितपणे दुधी भोपळा घ्यावा. दुधी भोपळ्यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. शिवाय दुधी भोपळ्यात असलेल्या इतर पौष्टिक घटकांमुळे रक्तवाहिन्यांमधील बॅड कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते आणि रक्तपुरवठा सुरळीत होतो.
- प्रेगन्सीमध्ये अतिशय उपयुक्तगरोदरपणात शरीराला काही पौष्टिक घटक मिळण्याची खूप जास्त गरज असते. भोपळ्याच्या माध्यमातून गर्भवती स्त्रियांना हे पदार्थ पुरेपुर प्रमाणात मिळू शकतात. त्यामुळे प्रेग्नंट महिलांनी दुधी भोपळा नियमितपणे खावा. अनेकदा प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठीही भोपळा खावा. कारण भोपळ्यामुळे पचनाच्या बहुतांश तक्रारी दूर होतात.
- शांत झोप लागण्यासाठी...निद्रानाशाचा त्रास होत असल्यास दुधी भोपळा खाणे फायद्याचे ठरते. याशिवाय दुधी भोपळ्याच्या तेलाने डोक्याला मालिश केल्यास निद्रानाशाचा त्रास दूर होतो. दुधी भोपळ्याचे तेल बनविण्यासाठी खोबरेल तेलात दुधी भोपळा किसून टाका. त्यासोबतच दुधी भोपळ्याची पाने आणि फुलेही टाका. हे तेल चांगले उकळू द्या. कोमट झाले की तेल गाळून घ्या आणि या तेलाने डोक्याला, तळपायाला मसाज करा. यामुळे शांत झोप लागते.
- अशक्तपणा घालविण्यासाठीकोणता मोठा आजारा होऊन अशक्तपणा आला असेल, तर अंगात तरतरी येण्यासाठी दुधी भोपळ्याचे सूप हा एक सर्वोत्तम उपाय आहे. अशक्त व्यक्तींना दुधी भोपळ्याचे सूप नियमित प्यायला दिले तर प्रकृती जलद सुधारते आणि अशक्तपणा दूर होतो. दुधी भोपळ्याचा हलवा देखील आजारी व्यक्तींसाठी एक टॉनिक ठरू शकतो.
- तळपाय होतील मुलायम थंडीच्या दिवसात तळपाय खूप खराब होतात. दुधी भोपळ्यापासून बनविलेले तेल तळपायांना नियमितपणे चोळल्यास हा त्रास कमी होतो. दुधी भोपळ्याचे तेल बनविण्यासाठी खोबरेल तेलात दुधी भोपळा किसून टाका. त्यासोबतच दुधी भोपळ्याची पाने आणि फुलेही टाका. हे तेल चांगले उकळू द्या. कोमट झाले की तेल गाळून घ्या आणि या तेलाने तळपायाला मसाज करा. हा उपाय रात्री करावा. मसाज झाल्यानंतर पायात सॉक्स घालावेत आणि घरातही हिंडणे फिरणे टाळावे.