वाढत्या वजनाची समस्या सध्या अनेकांना छळत आहे. महिला आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत ही समस्या आहेच. याचं कारण म्हणजे दोघांच्याही कामाच्या शैलीमध्ये बदल झाला आहे. व्यायामाचा अभाव, अधिकाधिक वेळ बैठं काम, जंकफूड खाण्याचं वाढलेलं प्रमाण, खूप जास्त स्ट्रेस, अनुवंशिकता, रात्रीची जागरणं या सगळ्यांचा परिणाम तब्येतीवर होतो आणि मग आरोग्याच्या इतर तक्रारींसोबतच वाढत्या वजनाचा त्रासही होऊ लागतो. पण वाढत्या वजनाची ही कारणं स्त्री आणि पुरुष या दोघांच्या बाबतीत सारखी असली तरी वजन कमी करण्यासाठी मात्र त्यांनी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात खाल्ले पाहिजेत असं सांगणारं एक संशोधन युनिव्हर्सिटी ऑफ वॉटर लू यांनी प्रकाशित केलं आहे.(Should Men And Women Eat Different Breakfasts For Weight Loss?)
या संशोधनामध्ये असं सांगितलं आहे की स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या शरीरातली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. संशोधनादरम्यान त्यांनी महिलांच्या चयापचय क्रियेचा आणि पुरुषांच्या चयापचय क्रियेचा खूप बारकाईने अभ्याास केला.
रोपांवर बुरशीसारखा पांढरट थर आला? 'हा' पदार्थ लगेच शिंपडा- रोप होईल निरोगी वाढेल भराभर
त्यात त्यांना असं लक्षात आलं की बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर जर पुरुषांना कार्बाेहायड्रेट्स जास्त असणारे पदार्थ दिले तर त्यांची चयापचय क्रिया अधिक चांगल्या पद्धतीने काम करते. तर महिलांची चयापचय क्रिया फॅटयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात घेतले तर उत्तम पद्धतीने काम करते. त्यामुळेच रात्रभर उपाशी राहिल्यानंतर सकाळी जेव्हा आपण नाश्ता करतो, तेव्हा नाश्त्यामध्ये पुरुषांनी कार्बोहायड्रेट्स जास्त असणारे तर स्त्रियांनी फॅट्स जास्त असणारे पदार्थ घेतले पाहिजेत.
पुरुषांनी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ घ्यावे?
१. वेगवेगळे ड्रायफ्रुट्स, बिया, भाज्या आणि फळं घालून केलेले ओट्स
२. पालक, केळी, बदाम यांच्या स्मुदी
दिवाळीसाठी घराची स्वच्छता करून, भांडी घासून हात खरखरीत झाले? ३ उपाय, हात होतील मऊ- मुलायम
३. सुकामेवा आणि बेरी प्रकारतली फळं घालून वाटीभर योगर्ट खाणेही चांगले
स्त्रियांनी नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ घ्यावे?
सुकामेवा, बेरी प्रकारतली फळं घालून केलेलं चिया पुडींग
वेगवेगळ्या भाज्या घालून केलेले पराठे
पनीरचे पदार्थ तसेच जवस आणि सफरचंदही खावं