Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवताना आधी चपाती खावी की भात? पाहा, पोटभर जेवून फिट-मेंटेन राहण्याचा सोपा फंडा

जेवताना आधी चपाती खावी की भात? पाहा, पोटभर जेवून फिट-मेंटेन राहण्याचा सोपा फंडा

Weight Loss Tips : चपाती की भात दोघांपैकी काय खायला हवं याबाबत लोकांच्या मनता संभ्रम असतो. (The right way to cook and eat chapati to lose weight)

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 04:19 PM2023-06-29T16:19:50+5:302023-06-29T16:35:07+5:30

Weight Loss Tips : चपाती की भात दोघांपैकी काय खायला हवं याबाबत लोकांच्या मनता संभ्रम असतो. (The right way to cook and eat chapati to lose weight)

Weight Loss Tips : The right way to cook and eat chapati to lose weight | जेवताना आधी चपाती खावी की भात? पाहा, पोटभर जेवून फिट-मेंटेन राहण्याचा सोपा फंडा

जेवताना आधी चपाती खावी की भात? पाहा, पोटभर जेवून फिट-मेंटेन राहण्याचा सोपा फंडा

भारतात सर्वाधिक लोक रोजच्या जेवणात  तांदूळ आणि गव्हापासून बनवलेल्या पदार्थांचा समावेश करतात. वजन कमी करण्यासाठी काहीजण चपाती खाणं सोडतात  तर काहीजण भाताचे पदार्थ टाळतात.  ( Should you eat rice and chapati together) भातामुळे वजन वाढणं, पोट सुटतं असं अनेकाचं मत असतं तांदळात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. चपाती गव्हापासून बनवली जाते. धान्यांच्या दाण्यांना रिफाईन करून  भात तयार केला जातो. चपाती की भात दोघांपैकी काय खायला हवं याबाबत लोकांच्या मनता संभ्रम असतो. (The right way to cook and eat chapati to lose weight)

चपाती आणि भात एकत्र खाणं उत्तम ठरतं का?

चपाती आणि भात दोन्ही एकत्र कधीच खाऊ नये. या दोन्हींमध्ये अंतर ठेवायला हवंय जेव्हा तुम्ही हे तुम्ही पदार्थ खाता तेव्हा ते आतड्यात जाऊन बसतात. परीणामी ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो. या दोन्ही अन्नांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. शरीरातील स्टार्च वाढू लागते. या दोन्हींमुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. सूज येऊ लागते, यामुळे वजन वाढण्याची आणि पोट खराब होण्याचीही शक्यता  असते.

आधी चपाती आणि त्यानंतर भात खाल्ला जातो. आधी भात खाऊ नये कारण त्यामुळे आधी तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुम्ही संपूर्ण जेवण व्यवस्थित खाऊ शकत नाही. म्हणून आधी चपाती खाऊन नंतर भात खायला हवा. असं केल्यानं जास्तवेळ भूक लागणार नाही.

भात आणि चपाती दोघांमध्येही कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ खाल्ल्यानं शरीरात स्टार्च अब्जॉपर्शन होते. चपाती आणि भात एकत्र खाल्ल्याने दोन्हीमध्ये असलेल्या पोषकतत्त्वांमध्ये संघर्ष निर्माण होतो, ज्यामुळे त्यांचे शोषण होण्यास अडथळा निर्माण होतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जर तुम्ही  चपाती आणि भात दोन्ही एकत्र खात असाल तर आतापासून असे करू नका. एकावेळी एकच पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही भात खात असाल तर चपाती खाऊ नका आणि जर तुम्ही चपाती खात असाल तर भात खाऊ नका. जर तुम्हाला दोन्ही गोष्टी खायला आवडत असतील तर अंतर ठेवून खा. प्रथम चपाती खा. त्यानंतर भात खा. असे केल्याने तुम्हाला दोन्ही धान्यांमधून पूर्ण पोषण मिळू शकेल आणि अपचन आणि गॅसचा त्रास होणार नाही.

Web Title: Weight Loss Tips : The right way to cook and eat chapati to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.