Join us  

रात्री झोपण्यापूर्वी १ ग्लास दूधात 'हा' पदार्थ घालून प्या; ४ इंच घटेल कंबर-झटपट सपाट होईल पोट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 4:59 PM

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होईल

आजकाल लोकांची लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्या सवयी बदलल्या आहेत. ज्यामुळे लोक  स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेळ काढू शकत नाहीत. तासनतास एकाच जागी बसल्यामुळे लोक लठ्ठपणाचे शिकार होते आहेत.(cinnamon for weight loss) वाढलेल्या वजनामुळे वजन कमी करण्यासाठी जीममध्ये तासनतास घालवावे लागतात. डाएटींग केल्यानंतर वजन कमी होत  नाही. अशावेळी तुम्हाला खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. अनेकजण वजन कमी करण्यासाठी  गोड आणि तेलकट खाणं सोडतात. (Weight Loss Drink Cinnamon for Weight)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अशा काही पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ज्यामुळे लवकरात लवकर वजन कमी होण्यास मदत होईल. अनेकजण रात्री दूध पिऊन झोपतात. दूधाबरोबर लोक आपले आवडीचे पदार्थही खातात. तुम्ही जर वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर दूधाबरोबर दालचिनी मिसळून पिऊ शकता. रात्री हे ड्रिंक प्यायल्याने वजन कमी होण्यास  मदत होईल. (fast weight loss)

वजन कमी करण्यासाठी हे दूध कसे फायदेशीर ठरते?

दूधात पेप्टाईड YY हार्मोन असते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. दूध कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत  आहे. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म बुस्ट होण्यास मदत होते, वेगाने फॅट्स बर्न होतात. दूधात प्रोटीन्स, व्हिटामीन बी-१२ आणि कॅल्शियम यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. 

रोज चालता तरी १ इंच ही पोट कमी होत नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, झरझर घटेल वजन

रात्री झोपताना दालचिनीयुक्त दूध प्यायल्याने  चांगली झोप येण्यात मदत होते तर तुम्हाला झोप न येण्याची समस्या उसेल किंवा  चांगली झोप येत नसेल तर हे दूध प्याययल्याने बरेच फायदे मिळतील. म्हणूनच झोपण्याआधी एक ग्लास दूधात दालचिनी मिसळून प्या.  

जेवल्यानंतर ग्लासभर  दालचिनीचे पाणी प्यायल्याने पचक्रिया चांगली राहते. पोटाच्या समस्या असतील म्हणजेच गॅस, एसिटीडी असेल तर दालचिनीयुक्त दूधाचे सेवन करू शकता. यामुळे गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो. रोज झोपण्याआधी दूध पिण्याची सवय ठेवा ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो. दालचिनीचे दूध वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे बराचवेळ पोट भरलेले राहते आणि वजन कमी करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. फॅट लॉससाठीही उपाय फायदेशीर ठरू शकतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स